सुएझ कालव्यापेक्षा मिनी कालवा कुठे तयार होत आहे ?
जगातील सर्वात मोठा कालवा कुठला तर त्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे, सुएझ कालवा. इजिप्तमधील हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडतो. तब्बल 193.3 किलोमीटर लांबीचा हा कालवा 1932 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली. 1869 मध्ये सुएझ कालवा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला झाला तेव्हा हा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा चमत्कार मानला गेला. सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया किंवा दोन खंडांमधील सागरी वाहतूक शक्य झाली. आजही या सुएझ कालव्याला फक्त बघायला अनेक पर्यटक जातात. आत्तापर्यंत हजारो व्हिडिओ या कृत्रिम कालव्याचे तयार करण्यात आले आहेत. मध्यंतरी या कालव्यामध्ये एक अवाढव्य जहाज अडकले, तर ती जगातील सर्वात चर्चित ब्रेकिंग न्यूज झाली. अशा या लोकप्रिय कालव्याव्यासारखाच एक अन्य कृत्रिम कालवा लवकरच तयार होणार आहे. सुएझ कालव्यावर येत असलेल्या अतिरिक्त भारामुळे हा नवा कालवा तयार करण्यात येत आहे. (Suez Canal) latest marathi stories
सुएझ कालवा हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार मानण्यात येतो. या कालव्याच्या निर्मितीमुळे समुद्र वाहतुकीत सुलभता आली आहे. मात्र या कालव्यावर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे असाच एक कालवा तयार करावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता एक मिनी सुएझ कालवा तयार होत आहे. 6 ऑगस्ट 2015 रोजी, या कालव्याच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. सुएझ कालव्याला समांतर असलेल्या 34 किमी अंतरावर हा कालवा उभारण्यात येत आहे. त्यामुळे येथून दिवसभरात 97 जहाजे जाऊ शकणार आहेत. या मिनी सुएझ कालव्याचा खर्च फक्त 163 अब्ज रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. यामुळेच या कालव्याचे महत्त्व किती आहे, हे समजून येते. या कालव्याची एकूण लांबी 54 किमी असेल. त्याचा उपयोग समुद्र वाहतुकीसाठी तसेच वाळवंटी परिसर हिरवागार करण्यासाठी केला जाणार आहे. या मिनी सुएझ कालव्यामुळे या भागात येणारी जमीन ही मनुष्याला रहाण्यायोग्य होणार असल्याचा तज्ञांचा दावा आहे. (International News)
सुएझ कालव्याची मालकी इजिप्तकडे आहे. इजिप्त देशच आता नवा मिनी सुएझ उभारत आहे. मध्यंतरी मुख्य सुएझ कालव्यात एक जहाज तब्बल सहा दिवस अडकले होते. त्यामुळे या कालव्यात मोठी कोंडी झाली. हजारो मालवाहतूक जहाजं समुद्रात अडकून पडली. या घटनेमुळे सुएझ कालव्याला एखादा पर्याय असावा ही इजिप्तची कल्पना अन्य देशांनीही मान्य केली असून जगभरातून इजिप्तला यासाठी मदत होत आहे. याशिवाय इजिप्तचा यामागे दुसरा मोठा दृष्टीकोन आहे. इजिप्तमध्ये मनुष्याला रहाण्यायोग्य अत्यंत कमी जमीन आहे. त्यामुळे हा देश आपल्या लोकसंख्याविषयक आव्हानांना तोंड देत आहे. मिनी सुएझ कालवा तयार झाल्यावर इजिप्तच्या वाळवंटातील जमीन राहण्यायोग्य होणार आहे. या जमिनीवर विकासकामे करुन त्याचा उपयोग होणार आहे. सध्या इजिप्तमधली फक्त 4 टक्के जमीन राहण्यायोग्य आहे. या एवढ्या जमिनीवर 113.5 दशलक्ष लोक राहतात. त्यामुळे आपल्या देशातील नागरिकांचे रहाणीमान सुधारण्यासाठी त्यांना अधिक जमिनीचा पुरवठा करणे हे इजिप्तचे लक्ष आहे. इजिप्तचा 90% पेक्षा जास्त भाग हा वाळवंटी आहे. त्यात सहारा वाळवंटाचा भागही आहे. (Suez Canal)
======
हे देखील वाचा : तो आलाय तब्बल ऐंशी हजार वर्षांनी !
====
या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी, इजिप्तने याच वाळवंटी भागाला रहाण्यायोग्य करण्याचे ठरवले आहे. यासाठी इजिप्त सरकारनं दीर्घकालीन योजना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून मिनी सुएझ कालव्याच्या उभारणीकडे बघण्यात येत आहे. या कालव्याच्या बांधकामामुळे भूमध्य समुद्राचे पाणी वाळवंटाच्या मध्यभागी आणले जाणार आहे. हा कालवा तयार झाल्यावर वाळवंटी क्षेत्रात 20,000 चौरस किलोमीटरचे तलाव तयार होणार आहे. या पाण्याचा वापर करुन नापीक जमिनी करण्यासाठी होऊ शकतो. शेतीचा विकास झाल्यास या भागात मनुष्यवस्ती वाढेल आणि विकासकामेही करता येतील, अशी इजिप्त सरकारची योजना आहे. या वाळवंटात कायमस्वरुपी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्यास काही वर्षांनी येथे नैसर्गिक पाऊसही पडेल असा अंदाजही तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सहारा वाळवंटाला हिरवे करण्यासाठीही या मिनी सुएझ कालव्याचा उपयोग होणार आहे. (International News) top stories
Original content is posted on: https://gajawaja.in/suez-canal-marathi-info/
Comments
Post a Comment