Posts

Showing posts from September, 2024

काळाराम मंदिरचा इतिहास आणि माहिती

Image
  नाशिक भारतातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे. शिवाय देशातील हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरांचे शहर म्हणून देखील नाशिकची एक ओळख आहे. अतिशय पवित्र आणि मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या या नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक बाबतीत मोठे महत्व आहे. top stories अतिशय प्रसन्न आणि अल्ह्हादायक वातावरण असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. अशा या नाशिकमधील एक मंदिर असतीशय मोठे आणि जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराबद्दल अनेकांना मोठे कुतूहल आणि उत्सुकता जाणून घेण्यासाठी. देशविदेशातील असंख्य पर्यटक या मंदिरात भेट देण्यासाठी येतात आणि मनशांती अनुभवतात. असे हे अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावनभूमीमधील हे काळाराम मंदिर जगविख्यात...

रडण्याचा-झोपण्याचा सुद्धा मिळतो पगार !

Image
  एखादा चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रत्येक जण शिक्षण घेऊन, मेहनत घेऊन स्वत:ला तयार करत असतो. चांगला पगार मिळावा म्हणून करियर सुद्धा तशा प्रकारे निवडले जातात. पण जगात काही असे जॉब्स आहेत ज्याला मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही पण त्यात पैसे मात्र चांगले मिळतात. या जॉब्स बद्दल ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हा काय जॉब आहे का? तर जाणून घेऊया. व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अंतसंस्काराच्या वेळेस या देशांमध्ये अशा प्रोफेशनल रडणाऱ्यांना बोलावलं जातं, ज्यांना Mourner किंवा Moirologist म्हंटलं जातं. ज्यांना तासानुसार रडण्याचे पैसे मिळतात. हे काम प्राचीन काळापासून सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य होईल, पण हे काम भारतात सुद्धा केलं जातात. राजस्थानच्या काही भागांमध्ये महिला असं रडण्याच काम करतात. त्या फक्त काळ्या साड्या घालतात, कारण काळा रंग हा यम देवाचा Favourite रंग आहे. (Hardworking Job) Top stories या महिलांना रुडालीस म्हंटलं जातं. लाइन कुठलीही असो, त्यात उभं राहायला कंटाळा प्रत्येकाला येतोच. आता आयफोन 16 हा फोन घेण्यासाठीच लोकांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये अॅपलच्या स्टोअरवर किती मोठी लाइन लावलेली तुम्ही बघ...

अभिजित सावंतच विनर असावा यासाठी चाहतीचे केदार शिंदेंना पत्र

Image
सध्या मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व सुरु आहे. मराठी बिग बॉसच्या सर्वच पर्वांपेक्षा सध्याचे पाचवे पर्व कमालीचे गाजत आणि लोकप्रिय होत आहे. तसे पाहिले तर बिग बॉस हा शो १०० दिवसांचा असतो. १०० दिवस एका कॅमेऱ्यांनी भरलेल्या घरामध्ये कोणत्याही चैनीच्या वस्तूंशिवाय सदस्यांना राहायचे असते. २४ तास त्यांच्यावर कॅमेऱ्यांची नजर असते. अशा या शोमध्ये १०० दिवस टिकणारा व्यक्ती विजेता म्हणून घोषित होतो आणि त्याला रोख रक्कम आणि इतर बक्षिसं दिली जातात. Top stories . मराठी बिग बॉसचे तुफान गाजणारे पर्व पाहून अनेकांना वाटत होते की, हे पर्व नक्कीच जास्त दिवस चालणार. १०० दिवसांपेक्षा जास्त हा शो सुरु राहील. मात्र अशातच एक बातमी आली की लवकरच हा शो निरोप घेणार आहे. केवळ ७० दिवसांमध्ये हा शो संपणार असून, येत्या ६ ऑक्टोबरला शोचा फिनाले होणार आहे. घरातील वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सोशल मीडियावर देखील कोण जिंकणार याबद्दल चर्चा सुरु आहेत. प्रत्येक जणं त्याच्या आवडत्या कलाकाराला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत ...

भारत देश शाकाहारी आहे की मांसाहारी?

Image
  उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील एका सात वर्षाच्या मुलाला त्याच्या शाळेतून काढून टाकण्यात आलं. काढून टाकण्याचं कारण काय तर त्याने शाळेत डब्याला मांसाहारी बिर्याणी आणली आणि  ती मित्रांमध्ये वाटून खाली म्हणून. या प्रकरणाची चौकशी बेसिक शिक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण यामुळे पुन्हा एकदा वर्षांनुवर्षे चालत आलेला वाद समोर येतो, आणि तो वाद म्हणजे Veg VS Nonveg, आणि काही प्रश्न ही समोर येतात. भारतात पुरातन काळात नॉनवेज खाल्लं जातं होतं की नाही? भारतात सर्वाधिक लोक शाकाहारी आहेत का? आणि माणूस निसर्गत: शाकाहरी होता की मांसाहारी? वाद गंभीर आहे, पण चविष्ट सुद्धा. (India)  Top stories अश्मयुगीन काळातली माणसं Non Veg होती की Veg या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय काही शास्त्रज्ञांनी. त्यांनी हजारो वर्ष जुने मानवांचे दात आणि हाडांचा अभ्यास केला. ज्यामध्ये त्यांनी दात आणि हाडांमधील कार्बन आणि नायट्रोजनचे आयसोटोपीक घटक तपासले, तेव्हा त्यांच्या लक्षात हे आलं की अश्मयुगीन काळातली माणूस हा शाकाहारी होता. तसं बघायला गेलं, तर माणूस हा शाकाहारी प्राणी आहे. मांसाहारी प्राणी हे जीभ बा...

बापरे कोट्यधीचे पेंटिंग चोरीला

Image
पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित देशातील प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे कोट्यवधींचे पेंटिंग मुंबईमधून चोरीला गेले आहे. याप्रकरणी मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस. एच. रझा यांनी 1992 साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे हे पेंटिंग आहे. या ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. मात्र गोडाऊनमध्ये ठेवलेले हे पेंटिग नेमके कधी चोरीला गेले याची कल्पना नाही. त्यामुळे त्याच्या शोधण्याचे आव्हान मुंबई पोलीसांपुढे उभे राहिले आहे. प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे प्रसिद्ध नेचर पेंटिंग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चित्रकार सय्यद हैदर रझा यांनी भारतीय चित्रकलेचा व्यापक प्रचार जगभर केला आहे. त्यांनी 1992 साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे पेंटिंग हे खूप प्रसिद्ध आहे. ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. (Syed Haider Raza) Top stories. हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आल...

दहा वर्षांचा राजकीय डाव उलटविणार भाजप?

Image
  काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक मोठी संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजप त्या संधीचा लाभ घेतानाही दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे खचलेल्या भाजपला या निमित्ताने आयते कोलीत मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ टीकेचा भडीमार सहन करणारा भाजप राहुल गांधी कसे बालिश आहेत आणि वावदूक वक्तव्ये करतात, एवढेच सांगू शकत होता. परंतु आता पहिल्यांदाच भाजपला आपल्या विरोधकाला मुद्द्यावर घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वारे वाहत असताना दिसले तर नवल नाही. (Bharatiya Janata Party) Marathi news . राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. राहुल जेव्हा-जेव्हा परदेशात अशा अधिकृत दौऱ्यावर जातात तेव्हा तेथील काही संघटनांच्या वतीने त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. एरवीही चित्रविचित्र वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राहुल गांधी अशा कार्यक्रमांमध्ये जास्तच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. मागे इंग्लंडला गेले असताना त्यांनी “भारत हे राष्ट्र नाही,...

जाणून घ्या अनंत चतुर्दशीची माहिती

Image
  ज्या सणाची वर्षभर आपण सगळे आतुरतेने वाट पाहत असतो तो गणेशोत्सव सुरु होऊन आता दहा दिवस पूर्ण होत आले आहे. म्हणूनच आता लगबग सुरु झाली आहे ती बाप्पाच्या विसर्जनाची. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला, बाप्पा त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघतात. उद्या अर्थात १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. Marathi news . भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अर्थात अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होत आहे. या दहा दिवसांमध्ये आपण सगळेच बाप्पाच्या सेवेमध्ये अगदी लिन झालेलो होतो. मात्र आता बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेत त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. जाणून घेऊया लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहोत. त्याचा विधी आणि शुभ मुहूर्त काय आहेत. वैदीक पंचांगानुसार अनंत चतुर्दशी या तिथीची सुरुवात १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.१० वाजता सुरु होणार आहे. तर या चतुर्दशीची समाप्ती १७ सप्टेंबर २०२४ रोजी ११.४४ वाजता होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ...

आतिशी मार्ले दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री

Image
  आपल्या देशातील राजकारणामध्ये सतत अनेक अनपेक्षित अशा गोष्टी घडताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. Top stories . सीबीआयच्या खटल्यात त्यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. तर, ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता. त्यामुळे ते १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून बाहेर आले. नंतर १५ सप्टेंबर रविवार रोजी आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती. आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यानंतर आता आतिशी यां...

जाणून घ्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आहेत कोण?

Image
  अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. मात्र आता आम आदमी पार्टीने आणि अरविंद केजरीवाल यांनी आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील याची घोषणा केली. आतिशी यांच्या नावाची घोषणा होताच एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. Marathi news. आतिशी या आम आदमी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विश्वासू नेत्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी आतिशी यांच्या निवडी मागे त्या महिला असणे आणि मंत्री असणे या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. यासोबतच मुख्य बाब म्हणजे आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा आपचा जाहीरनामा आतिशी यांनीच तयार केला होता. सध्या त्यांच्याकडे महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या खात्यांचा कारभार आहे. आतिशी कोण आहेत ? आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. आतिशी यांचे वडील विजय सिंह ...

पितृ पक्षातील तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व

Image
  आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा दिवस. दहा दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत राहून आज आपला निरोप घेतात. नागपंचमीपासून आपल्याकडे सणांना सुरुवात होते. एकापाठोपाठ एक असे अनेक सण सुरु होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच देवांना अतिशय मानाचे आणि मोठे स्थान आहे. मात्र आपण जर पाहिले तर देवांसोबतच आपल्या पूर्वजांना आणि पितरांना देखील मोठे स्थान आहे. आपल्या धर्मात देव आणि पितर यांना अतिशय महत्वाचे समजले जाते. जसे काही विशिष्ट दिवस देवांसाठी राखीव ठेवले जातात तसेच वर्षातले १५ दिवस पितरांसाठी राखीव ठेवले जातात. Mararthi News. पितरांसाठी राखीव असलेल्या वर्षातल्या १५ दिवसांना पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हटले जाते. या १५ दिवसांमध्ये सर्वच आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण करत त्यांना जेवू घालतात. पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असतो. कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होते. या काळात आप...