पितृ पक्षातील तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि महत्व
आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा दिवस. दहा दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत राहून आज आपला निरोप घेतात. नागपंचमीपासून आपल्याकडे सणांना सुरुवात होते. एकापाठोपाठ एक असे अनेक सण सुरु होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच देवांना अतिशय मानाचे आणि मोठे स्थान आहे. मात्र आपण जर पाहिले तर देवांसोबतच आपल्या पूर्वजांना आणि पितरांना देखील मोठे स्थान आहे. आपल्या धर्मात देव आणि पितर यांना अतिशय महत्वाचे समजले जाते. जसे काही विशिष्ट दिवस देवांसाठी राखीव ठेवले जातात तसेच वर्षातले १५ दिवस पितरांसाठी राखीव ठेवले जातात. Mararthi News.
पितरांसाठी राखीव असलेल्या वर्षातल्या १५ दिवसांना पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हटले जाते. या १५ दिवसांमध्ये सर्वच आपल्या पूर्वजांना आठवून त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण करत त्यांना जेवू घालतात. पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असतो.
कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होते. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. यावर्षी पितृ पक्ष मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होणार आहे. त्याच वेळी, पितृ पक्षाची समाप्ती २ ऑक्टोबर २०२४ रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होईल.
पितृ पक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण, श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या काळात आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृ पक्षात तर्पण, श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून, त्यांचा आशीर्वाद हजेतला जातो. याकाळात श्राद्ध, तर्पण केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.
पितृ पक्ष २०२४ श्राद्ध तारखा
पौर्णिमा श्राद्ध – १७ सप्टेंबर २०२४ (मंगळवार)
प्रतिपदा – १८ सप्टेंबर २०२४ (बुधवार)
द्वितीया श्राद्ध – १९ सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
तृतीया श्राद्ध – २० सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
चतुर्थी श्राद्ध – २१ सप्टेंबर २०२४ (शनिवार)
महाभरणी – २१ सप्टेंबर २०२४ (शनिवार)
पंचमी श्राद्ध – २२ सप्टेंबर २०२४ (रविवार)
पष्ठी श्राद्ध – २३ सप्टेंबर २०२४ (सोमवार)
सप्तमी श्राद्ध – २३ सप्टेंबर २०२४ (सोमवार)
अष्टमी श्राद्ध – २४ सप्टेंबर २०२४ (मंगळवार)
नवमी श्राद्ध – २५ सप्टेंबर २०२४ (बुधवार)
दशमी श्राद्ध – २६ सप्टेंबर २०२४ (गुरुवार)
एकादशी श्राद्ध – २७ सप्टेंबर २०२४ (शुक्रवार)
द्वादशी श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४ (रविवार)
माघ श्राद्ध – २९ सप्टेंबर २०२४ (रविवार)
त्रयोदशी श्राद्ध – ३० सप्टेंबर २०२४ (सोमवार)
चतुर्दशी श्राद्ध – १ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार)
सर्व पितृ अमावास्या – २ ऑक्टोबर २०२४ (बुधवार)
Top Stories
Original content is posted on: https://gajawaja.in/pitru-paksha-2024-start-and-end-date-shradh-tithi-and-importance-marathi-info/
Comments
Post a Comment