भारत देश शाकाहारी आहे की मांसाहारी?
उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील एका सात वर्षाच्या मुलाला त्याच्या शाळेतून काढून टाकण्यात आलं. काढून टाकण्याचं कारण काय तर त्याने शाळेत डब्याला मांसाहारी बिर्याणी आणली आणि ती मित्रांमध्ये वाटून खाली म्हणून. या प्रकरणाची चौकशी बेसिक शिक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण यामुळे पुन्हा एकदा वर्षांनुवर्षे चालत आलेला वाद समोर येतो, आणि तो वाद म्हणजे Veg VS Nonveg, आणि काही प्रश्न ही समोर येतात. भारतात पुरातन काळात नॉनवेज खाल्लं जातं होतं की नाही? भारतात सर्वाधिक लोक शाकाहारी आहेत का? आणि माणूस निसर्गत: शाकाहरी होता की मांसाहारी? वाद गंभीर आहे, पण चविष्ट सुद्धा. (India) Top stories
अश्मयुगीन काळातली माणसं Non Veg होती की Veg या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय काही शास्त्रज्ञांनी. त्यांनी हजारो वर्ष जुने मानवांचे दात आणि हाडांचा अभ्यास केला. ज्यामध्ये त्यांनी दात आणि हाडांमधील कार्बन आणि नायट्रोजनचे आयसोटोपीक घटक तपासले, तेव्हा त्यांच्या लक्षात हे आलं की अश्मयुगीन काळातली माणूस हा शाकाहारी होता. तसं बघायला गेलं, तर माणूस हा शाकाहारी प्राणी आहे. मांसाहारी प्राणी हे जीभ बाहेर काढून पाणी पितात, तर शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात. शाकाहारी प्राण्याचे दात चपटे असतात, तर मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणकुचीदार असतात आणि त्यात फटी असतात. अशी अनेक उदाहरण आहेत. याचा विचार केला तर मानव निसर्गत शाकाहारी आहे हे कळतं. (Social News)
पण हळूहळू माणसाने आणखी एनर्जी आणि प्रोटिनसाठी मांसखायला सुरुवात केली असेल, ज्याची त्याला चटक लागली आणि मग ते तो आजपर्यंत खातोय असं आपण म्हणू शकतो. मांसामुळे आपण आणखी माणूस बनलो असही काही तज्ञांचं म्हणणं आहे. मांसाआहारकडे वळल्यामुळे आहारातली ऊर्जा वाढली, ज्यामुळे माणसाच्या मोठ्या मेंदूला सपोर्ट मिळाला. भारतात प्राचीन काळापासून मांसाहार प्रचलित आहे. ५००० वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीचे सापडलेले पुरावे हेच सांगतात की या संस्कृतीत वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खाल्ले जात होते. भारतात मांस खाणं हे जाती धर्मांवर सुद्धा अवलंबून होतं आणि आजही आहे. शिवाय भातावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे सुद्धा भारताच्या खाद्यसंस्कृतीत बद्दल झाले आहेत. (India)
आताच्या काळात बघायला गेलं तर भारतात ८०% लोकं मांसाहार करतात. थोडक्यात, भारत शाकाहारी देश नाही आहे. तरी भारतात काही शहरं अशी आहेत जी पूर्णपणे शाकाहारी आहेत म्हणजेच तिथे मांसहारावर बंदी आहे. जसं गुजरातमधील पालीताना, हे शहरं जगातलं पहिलं शाकाहारी शहरं आहे. प्रभू श्री रामांची जन्मभूमी असलेलं आयोध्या सुद्धा शाकाहारी शहरांमध्ये येतं, हिंदूधर्मात महत्तवाच स्थान असलेली शहरं म्हणजे उत्तराखंडमधील ऋषिकेश आणि हरिद्वार हे सुद्धा शाकाहारी शहरं आहेत. शिवाय, राजस्थान मधलं माऊंट अबू, उत्तरप्रदेशमध्ये असणारं वृंदावन आणि गुजरात मधलं गांधी नगर. जसं भारतात काही शहरात मांसाहारावर बंदी आहे तसं भारतात काही प्राण्यांचा मांसाहार करण्यास सुद्धा बंदी आहे. (Social News)
===============
हे देखील वाचा : विक्रोळीमुळे भारताची लोकशाही बळकट झाली
===============
तरी बऱ्याप्रमाणात भारतात आहारस्वातंत्र्य सुद्धा आहे. त्यामुळेच काही कुटुंबात सगळेच सदस्य शाकाहारी असतात, तर काही घरांमध्ये सगळेच मांसाहारी. वेज- नॉन वेज हा वाद खूप काळापासून चालत आला आहे आणि चालत राहिल. महत्त्वाचं हे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आहाराच्या सवयींना मान देऊन त्यांचा आदर करणे आवश्यक आहे. कोणी नॉन वेज आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणं आणि त्याला शाळेतून काढून टाकणं चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटत कोममेंट्स मध्ये नक्की सांगा. (India) Top stories.
Original content is posted on: https://gajawaja.in/is-india-vegetarian-or-non-vegetarian-marathi-info/
Comments
Post a Comment