रडण्याचा-झोपण्याचा सुद्धा मिळतो पगार !
एखादा चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रत्येक जण शिक्षण घेऊन, मेहनत घेऊन स्वत:ला तयार करत असतो. चांगला पगार मिळावा म्हणून करियर सुद्धा तशा प्रकारे निवडले जातात. पण जगात काही असे जॉब्स आहेत ज्याला मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही पण त्यात पैसे मात्र चांगले मिळतात. या जॉब्स बद्दल ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हा काय जॉब आहे का? तर जाणून घेऊया. व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अंतसंस्काराच्या वेळेस या देशांमध्ये अशा प्रोफेशनल रडणाऱ्यांना बोलावलं जातं, ज्यांना Mourner किंवा Moirologist म्हंटलं जातं. ज्यांना तासानुसार रडण्याचे पैसे मिळतात. हे काम प्राचीन काळापासून सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य होईल, पण हे काम भारतात सुद्धा केलं जातात. राजस्थानच्या काही भागांमध्ये महिला असं रडण्याच काम करतात. त्या फक्त काळ्या साड्या घालतात, कारण काळा रंग हा यम देवाचा Favourite रंग आहे. (Hardworking Job) Top stories
या महिलांना रुडालीस म्हंटलं जातं. लाइन कुठलीही असो, त्यात उभं राहायला कंटाळा प्रत्येकाला येतोच. आता आयफोन 16 हा फोन घेण्यासाठीच लोकांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये अॅपलच्या स्टोअरवर किती मोठी लाइन लावलेली तुम्ही बघितली असेल. अशाच कंटाळवान्या लाइनमध्ये उभं राहण्यासाठी तुम्ही तुमच्या ऐवजी एखाद्या माणसाला हायर करू शकता. हे काम करणाऱ्या माणसांना लाइन स्टँडर किंवा क्यू प्रोफेशनल म्हटलं जात. भारतात तर हा जॉब नाहीये पण पोलंड, रशिया, इटली आणि अमेरिके सारख्या देशात काही लोकं असं काम करतात. (International News)
पुढचा जॉब असा आहे जो अनेकांसाठी ड्रीम जॉबसुद्धा असेल. या जॉबमध्ये काहीच करावं लागत नाही, फक्त झोपाव लागतं. खरंच, असा जॉब अस्तित्वात आहे. हे झोपण्याच काम करणाऱ्यांना प्रोफेशनल स्लीपर म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कोणासाठी काम करतात. Mattress म्हणजे गादी बनवणाऱ्या कंपन्यांसाठी म्हणजे त्यांनी बनवलेल्या गादीवर झोपून त्यांना फीडबॅक हे स्लीपरस देतात. ज्यामुळे ती कंपनी त्यांच्या प्रॉडक्टची क्वालिटी आणखी सुधारू शकतील. शिवाय वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांना संशोधनात मदत करण्यासाठी सुद्धा ते झोपतात, म्हणजेच झोपण्याचं काम करतात. हे खरंच एक करियर आहे. हा जॉब मांजरी खूप सिरीयसली करतात नाही का? मांजरींवरुन आठवलं, एक जॉब असा आहे जो पाळीव प्राण्यांशी निगडीत आहे. माणसांना जसं चविष्ट पदार्थ खायला आवडतात, तसंच प्राण्यांना सुद्धा आवडतात. पाळीव प्राण्यांचा मालकांना आपले पेट चवदार आणि निरोगी अन्न खावे असं वाटत असतं. पाळीव प्राण्यांसाठी अन्न बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये एक माणूस असतो जो हे अन्न टेस्ट करण्याचं काम करतो. हे अन्न प्राण्यांसाठी योग्य आहे की नाही, चेक करण्याचं काम तो माणूस करतो. हे काम ऐकायला खूप विचित्र वाटतं असलं तरी या कामाचे खूप पैसे मिळतात. (Hardworking Job) Top stories
======
हे देखील वाचा : गोष्ट युट्यूबच्या जन्माची
======
सिंगल लोकांसाठी खुशखबर असलेला हा पुढचा जॉब आहे, पण फक्त जपानमध्ये असणाऱ्या. जपानमध्ये काही लोकं काही कंपन्या सिंगल लोकांना भाड्यावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड देतात. याला जपानमध्ये रेनटारु करेशी म्हणतात. तुम्ही एखाद्या मुलाला किंवा मुलीला काही तासांसाठी डेटवर घेऊन जाऊ शकता. हा फक्त डेटचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागतो आणि त्या भाड्यावर घेतलेल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला सुद्धा पैसे द्यावे लागतात. हे काम करण्यासाठी कॉन्फिडन्स सुद्धा तितकाच हवा. आपल्याकडे म्हटलं जातं कोणतच काम छोटं नसतं. बरोबर आहे, पण त्या कामाचा पगार कमी आणि स्ट्रेस जास्त असूच शकतो. कामाच्या स्ट्रेसमुळे स्वत:च जीवन संपवल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. या धावत्या जगात कामाचा स्ट्रेस येणं सहाजिक आहे आणि सर्वांना आपल्या आवडीच काम करण्याचा पर्याय नसतो. पण कामाच्या स्ट्रेसमुळे वाईट विचार मनात येऊ देऊ नका. कारण माणूस सलामत तो काम हजार. (International News)
Original content is posted on: https://gajawaja.in/hardworking-jobs-marathi-info/
Comments
Post a Comment