अभिजित सावंतच विनर असावा यासाठी चाहतीचे केदार शिंदेंना पत्र


सध्या मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व सुरु आहे. मराठी बिग बॉसच्या सर्वच पर्वांपेक्षा सध्याचे पाचवे पर्व कमालीचे गाजत आणि लोकप्रिय होत आहे. तसे पाहिले तर बिग बॉस हा शो १०० दिवसांचा असतो. १०० दिवस एका कॅमेऱ्यांनी भरलेल्या घरामध्ये कोणत्याही चैनीच्या वस्तूंशिवाय सदस्यांना राहायचे असते. २४ तास त्यांच्यावर कॅमेऱ्यांची नजर असते. अशा या शोमध्ये १०० दिवस टिकणारा व्यक्ती विजेता म्हणून घोषित होतो आणि त्याला रोख रक्कम आणि इतर बक्षिसं दिली जातात. Top stories.

मराठी बिग बॉसचे तुफान गाजणारे पर्व पाहून अनेकांना वाटत होते की, हे पर्व नक्कीच जास्त दिवस चालणार. १०० दिवसांपेक्षा जास्त हा शो सुरु राहील. मात्र अशातच एक बातमी आली की लवकरच हा शो निरोप घेणार आहे. केवळ ७० दिवसांमध्ये हा शो संपणार असून, येत्या ६ ऑक्टोबरला शोचा फिनाले होणार आहे. घरातील वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

सोशल मीडियावर देखील कोण जिंकणार याबद्दल चर्चा सुरु आहेत. प्रत्येक जणं त्याच्या आवडत्या कलाकाराला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत पोस्ट शेअर करताना दिसत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक पत्र खूपच व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये लिहिलेला मजकूर वाचून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. एका फॅनने हे पात्र कलर्स चॅनेलला लिहिले आहे. या पत्रामध्ये त्याने अभिजित सावंतला विजेता घोषित करा अशी विनंती करत, तो विजेता का होऊ शकता याची अनेक कारणं दिली आहेत. नक्की काय आहे पात्रात जाणून घेऊया.

“अभिजीतची एक फॉलोअर…

आदरणीय,

एंडेमोल शाइन इंडिया, केदार सर, बिग बॉस मराठी पाच पर्व, ‘कलर्स मराठी’ यांस

पत्रास कारण की, सूरजला जरी खूप व्होट मिळाले तरी, अभिजीतने खेळ खूप प्रामाणिकपणे, माणूसकी जपून, राजनैतिक मार्ग वापरून असा बहुआयामी खेळ खेळला आहेस. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता हा ‘अभिजीत’च असला पाहिजे. सूरज हा विजेता आहे; लोकांच्या हृदयाचा, सूरज आणि अभिजीत दोघेही माणूस म्हणून चांगलेच आहेत. पण कर्तृत्व सिद्ध ‘अभिजीत’ने केलं आहे.

एकच विनंती आहे, यावेळेस विजेता ‘अभिजीत’च असला पाहिजे. सूरजसाठी तुम्ही एक प्रोजेक्ट वेगळा करू शकता. जिथे लोक ऑनलाइन पैसे पाठवतील आणि यातून सूरजला त्याचं घर बांधण्यासाठी मदत होईल. पण ‘अभिजीत’बरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका. ही विनंती.

अभिजीतची एक फॉलोवर.”

=================

हे देखील वाचा : बिग बॉसच्या घरात बाबांना पाहून अंकिताला अश्रू अनावर

================

या पत्रावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. हे पत्र कमालीचे व्हायरल झाले असून, अनेकांनी या पत्राला आणि पात्रातील मजकुराला पाठिंबा देत अभिजीतनेच हा शो जिंकावा असे सांगितले आहे. दरम्यान सध्या शोमध्ये फॅमिली वीक टास्क चालू असून, यात स्पर्धकांच्या घरातील व्यक्ती त्यांना घरात येऊन भेटत आहे. अभिजीतची बायको आणि त्याच्या मुली देखील त्याला भेटायला येऊन गेल्या तेव्हा तो खूपच भावुक झाला होता.

आता तर या आठवड्यात सर्व सदस्यांना ‘बिग बॉस’ने नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार आहे. Top stories



 

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी