डॉकी मिल्कची वाढती क्रेझ
भारतात सध्या मोठ्याप्रमाणात स्टार्टअप सुरु होत आहेत. यात तरुण वर्ग पुढाकार घेत असून त्यातून नवीन उद्योगाची उभारणी होत आहे. मुख्य म्हणजे, तरुण वर्ग फक्त उद्योगाकडे वळला नसून तो शेतीउद्योगातही पुढाकार घेत आहे. शेती आणि शेती पुरक व्यवसायातही आलेल्या या तरुणांनी विविधता जोपासली आहे. या तरुणांमध्ये गुजरातच्या एका तरुणानं सुरु केलेल्या गाढवांच्या फार्म हाऊसची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे . (Donkey Milk) गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील धिरेन सोलंकी यानं नोकरी मिळाली नाही म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला. तोही गाढवाच्या दुधाचा. त्यासाठी त्यानं आपल्या बचतीच्या पैशातून गाढवांची खरेदी केली. आता हा धिरेन या दुधापासून दरमहा लाखो रुपये कमवत आहे. त्याची या स्टार्टअपची स्टोरी सध्या सोशल मिडीयावर सर्वाधिक चर्चेत आहे. वास्तविक गाढवाचे दुध हे सौदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. इजिप्तची राणी क्लियोपात्रा ही जगातील सर्वात सुंदर राणी मानली जाते. ही क्लियोपात्रा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गाढवाच्या दुधात आंघोळ करायची अशी कथा सांगितली जाते....