घरच्या घरी ‘या’ एक्सरसाइज करूनही राहा फीट, जिमलाही जाण्याची गरज नाही
कामाचा तणामुळे बहुतांशजणांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. खासकरुन महिलांसाठी हे आव्हानात्मक असते. जर तुम्ही जिमला जाऊ शकत नसल्यास घरच्या घरी काही सोप्या एक्सरसाइज करू शकता.
Easy Home Exercise : प्रत्येकालाच आयुष्यात हेल्दी आणि फिट राहायचे असते. यामुळे बहुतांशजण जिमचा पर्याय निवडतात. पण काही महिने अथवा आठवडे जिममध्ये गेल्यानंतर तेथे जाणे सोडतात. खरंतर, धावपळीच्या आयुष्यात जिममध्ये जाऊन व्यायाम करणे प्रत्येकासाठी शक्य नसते. पण तुम्ही जिमशिवाय घरच्याघरीही काही एक्सरसाइज करू शकता. जेणेकरून तुम्ही फिट राहण्यास मदत होईल.
दररोज स्क्वॉट्स एक्सरसाइज करा
दररोज दहा ते पंधरा मिनिटे स्क्वॉट्स एक्सरसाइज करा. यामुळे पाय, कंबर, ग्लूट्सचे स्नायू टोन होण्यासह मजबूत होऊ शकतात. याशिवाय फॅट्स वेगाने कमी होण्यासही मदत होते.
लिफ्टएवजी पायऱ्यांचा वापर करा
दररोज लिफ्टएवजी पायऱ्यांचा वापर करा. तुमचे घर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असेल तरीही पायऱ्यांनी चालत जा. जेणेकरुन तुमचे चालणे होईलच. पण पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त शारिरीक हालचालही होईल. (Easy Home Exercise)
ब्रिस्क वॉक करा
ट्रेडमिलवर धावण्याएवजी ब्रिस्क वॉक करू शकता. यावेळी तुम्हाला केवळ वेगाने चालायचे असते. असे केल्याने वेगाने फॅट्स बर्न होऊ शकतात. दररोज दहा-पंधरा मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने फिट राहण्यास मदत होईल.
पुशअप्स आणि पुलअप्स करू शकता
हाताचे मसल्स मजबूत होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पुलअप्स किंवा पुशअप्स करू शकता. यामुळे मसल्स टोनही होतील. याशिवाय पोटावरील चरबीही कमी होईल.
Comments
Post a Comment