माया संस्कृतीची राजेशाही अचानक कशी संपली
जगभरात काही प्राचीन संस्कृती होत्या, त्या आता काळाच्या आड गेल्या आहेत. मात्र त्याबद्दलची उत्सुकता कधीही कमी झाली नाही. त्यातीलच एक सभ्यता म्हणजे, माया संस्कृती. अमेरिकेची प्राचीन माया सभ्यता ग्वाटेमाला, मेक्सिको, होंडुरास आणि युकाटन द्वीपकल्पात प्रस्थापित होती. माया सभ्यता १५०० बीसीमध्ये सुरू झाली. ही सभ्यता ३०० AD आणि ९०० AD च्या दरम्यान शिखरावर पोहोचली होती. ११ व्या शतकापासून या माया सभ्यतेचा –हास सुरु झाला.(Maya Civilization)
१६ व्या माया सभ्यता संपली, मात्र अनेक प्रश्न ठेऊन गेली. कारण माया सभ्यता म्हणजे संपन्न संस्कृती होती. त्यात सोन्याचे विलगीकरण कसे करायचे, याचा शोध लागला. अतिशय संपन्न अशी ही माया संस्कृती जशी उदयाला आली, तशीच लोप पावल्यानं त्याबद्दल अनेक वावड्या उठल्या. त्यात माया संस्कृती आणि परग्रहवासी एकच असल्याचे म्हटले गेले.
कारण या काळात तंत्रज्ञानाची प्रगती आश्चर्यचकीत करणारी होती. माया संस्कृतीतील घरे ही आधुनिक सुखसुविधा असणारी असल्याचे अनेक पुरावे शोधले गेले. ही सर्व प्रगती परग्रहवासीयांच्या मदतीने झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच संशोधक माया संस्कृतीचा सातत्यानं शोध घेत आहेत. यातील अमेरिकेच्या संशोधकांना नुकतेच यश प्राप्त झाले आहे. जगातील रहस्यमय माया संस्कृतीची राजेशाही अचानक कशी संपली हे या संशोधकांनी शोधून काढले आहे. (Maya Civilization)
अमेरिकन संशोधकांनी माया राजघराण्याबाबत एक मोठा शोध लावला आहे. त्यांना एका दगडाखाली मोठ्या प्रमाणात मानवी हाडे आढळून आली. या हाडांचे परिक्षण केल्यावर ती सोळाव्या शतकाआधीची असल्याचे स्पष्ट झाले. मग त्याचे अधिक काळजीपूर्वक परिक्षण केल्यावर ही सर्व मानवी हाडे, माया सभ्यतेतील राजा आणि त्याच्या कुटुंबियांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना मध्य अमेरिकन देश ग्वाटेमालामधील एका प्राचीन माया मंदिराच्या पिरॅमिडमध्ये चार प्रौढ व्यक्तींच्या हाडांचे तुकडे सापडले. माया सभ्यतेत राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्यांना पिरॅमिडमध्ये दफन करण्यात येत असे. (Maya Civilization)
त्यामुळे ही हाडे राजघराण्यातील व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांना या पिरॅमिडची पाहणी करातांना २०२२ मध्ये बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्याखाली जळलेली हाडे आणि काही वस्तू सापडल्या. त्यावर गेल्या दोन वर्षापासून संशोधन सुरु आहे. यो सर्व मोहिमेचे नेतृत्व डॉ. क्रिस्टीना हॅलपेरिन करत आहेत. जी मानवी हाडे सापडली आहेत, त्यापैकी दोघांचे वय २१ ते ३५ वर्षे आणि एकाचे वय ४० ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे. या मानवी हाडांसोबत अनेक जळलेल्या वस्तूंचे अवशेषही मिळाले आहेत. यामध्ये ग्रीनस्टोनपासून बनविलेले दागिने, प्राण्यांच्या दातांपासून बनवलेले पेंडंट, शंखापासून तयार केलेले मणी, शस्त्रे यांचा समावेश होता.
या वस्तू राजाचे निधन झाल्यास त्याच्यासोबत ठेवण्यात येत असत. हे अवशेष जिथे मिळाले ती जागा ग्वाटेमाला सिटीच्या उत्तरेस ४०० किलोमीटर अंतरावर आहे. येथेच माया सभ्यतेच्या दरम्यान मुख्य राजधानी असल्याची माहितीही आहे. त्यामुळे ही मानवी हाडे ही राजा आणि त्याच्या कुटुंबाची असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जाळल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. माया संस्कृतीमध्ये दफन करण्यात येत असे.
=============
हे देखील वाचा : वादग्रस्त माफीवीर सॅम पित्रोदा
=============
मात्र इथे राजाला जाळण्यात आले आहे, याला कारणीभूत कौंटुबिक कलह असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. जळलेल्या हाडांची तपासणी केल्यावर आढळून आले आहे की, ज्या जेष्ठ पुरुषाची हाडे मिळिली ती सुमारे ८०० अंश सेल्सिअस तापमानात जळाल्याचा अंदाज आहे. ही घटना ७७३ ते ८८१ च्या सुमारास झाली असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. रेडिओकार्बन डेटिंगवरून यासंदर्भात परिक्षण करण्यात आले आहे. नवव्या शतकाच्या पूर्वार्धात जेव्हा अवशेष जाळण्यात आले, तेव्हा कोरलेल्या माया शिलालेखांमध्ये पापामलिल नावाच्या नवीन शासकाच्या कृतींचा उल्लेख आहे. यावरुन माया संस्कृतीच्या नाशाला कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे संशोधकांचे मत आहे. (Maya Civilization)
माया संस्कृतीमध्ये राजाल सर्वाधिकार असायचे. राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा राजगादीवर बसायचा. पण तो शूर आणि पराक्रमी नसेल तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्ती किंवा त्याचे भाऊही राजगादीसाठी झगडत असत, अशाच वादातून माया संस्कृती लोप पावल्याचे संशोधकांचे मत आहे.
सई बने
Original content is posted on: https://gajawaja.in/how-the-monarchy-of-the-mayan-civilization-suddenly-ended-marathi-info/
Comments
Post a Comment