Skin Care Tips : मेकअप करून व्यायाम करता का? त्वचेसंबंधित उद्भवतील या गंभीर समस्या
व्यायाम करताना तुम्ही मेकअप करता का? तर पुढील माहिती नक्की वाचा.
Skin Care Tips : मेकअप केल्यानंतर व्यायाम करावा की नाही? खरंतर, मेकअप प्रोडक्ट्समध्ये काही केमिकल्स असतात, जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. अशातच सौंदर्य खुलून दिसण्याच्या नादात मेकअप करून व्यायाम करत असाल तर सावध व्हा. नुकतेच कॉस्मेटिक डर्मेटोलॉजीचे एक जर्नल प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, मेकअप करून व्यायाम केल्याने त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर……
मेकअप करून व्यायाम करू नये
रिसर्चनुसार, त्वचेमधील मॉइश्चरचा स्तर, तेल, पोर्सचा आकार कळू शकतो. शोधात चेहऱ्यावर मेकअप केला जाणारा हिस्सा आणि मेकअप न केलेला हिस्सा यांच्यामध्ये तुलना करावी. यानुसार कळते की, मेकअपचा हिस्सा त्वचेवरील मॉइश्चरचा स्तर हा मेकअप न केलेल्या त्वचेपेक्षा अधिक होता. याव्यतिरिक्त मेकअप करण्यात आलेल्या त्वचेवर लहान पोर्स होते. याचा अर्थ असा होतो की, स्किनला मेकअपच्या कारणास्तव व्यवस्थितीतरित्या ऑक्सिजन मिळत नाहीये.
मेकअप करून व्यायाम केल्याने होणारे दुष्परिणाम
-त्वचेवर सीबमच्या हाय लेवलच्या कारणास्तव एक्नेसारखी समस्या उद्भवू शकते. ज्यावेळी त्वचेवर मेकअप लावतो तेव्हा सीमबचे प्रमाण अधिक वाढले जाते.
-मेकअपच्या कारणास्तव त्वचेवरील पोर्स ब्लॉक होतात. ज्यावेळी एक्सरसाइज करतो तेव्हा त्वचेमधील घाम निघू लागतो आणि तो बाहेर पडू शकत नाही. अशातच त्वचेमध्ये घाम जिरल्यास एक्नेची समस्या उद्भवते. (Skin Care Tips)
-अत्याधिक मेकअप लावून व्यायाम केल्यास डोळ्यांची जळजळ होऊ शकते.
-याशिवाय व्यायाम करताना निघणाऱ्या घामामुळे मेकअप केला असल्यास स्किन अॅलर्जी, खाज आणि रॅशेज येऊ शकतात.
(अशाच लाइफस्टाइलसंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
आणखी वाचा :
पार्लरमध्ये मॅनिक्युअर करता? त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ समस्या
उन्हाळ्यात पायांना भेगा पडतायत? करा हे घरगुती उपाय
सनस्क्रिन लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, जाणून घ्या अप्लाय करण्याची योग्य पद्धत
Orignal content is posted on: https://gajawaja.in/skin-care-tips-exercise-with-make-up-may-cause-skin-problems/
Comments
Post a Comment