नियमित आलं खा आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा
हिवाळ्यात अनेक आजार पटकन होतात. हा ऋतू आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला मानला जातो. कारण या ऋतूमध्ये आपण जो काही पोषक, सकस आहार घेतो तो आपल्याला वर्षभर टिकेल एवढी ऊर्जा देतो. त्यामुळे हिवाळ्यात चार महिने सगळ्यांनीच उत्तम आहार घेतलाच पाहिजे. हिवाळ्यात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आलं. आलं हे बाराही महिने भारतामध्ये वापरले जातात. कधी कधी भाज्यांसोबत फ्रीमध्ये मिळणारं आलं, आता खूपच महाग झाले आहे. आलं म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो, आल्याचा चहा. आपल्या देशात आल्याच्या चहाला अनन्यसाधारण महत्व आहे. चहासोबतच आलं भाज्यांमध्ये, विविध प्रकारांच्या डाळींमध्ये देखील वापरले जाते. आल्याची पेस्ट किंवा आलं जसे आपल्या जेवणाला चहाला चव देते तसे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत. आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. आलं झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मस...