हिवाळ्यात ‘या’ सोप्या टिप्स वापरून घ्या ओठांची काळजी


हिवाळा सुरु झाला की, अनेकांना आनंद होतो. कारण हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला समजला जातो. मात्र याउलट हाच हिवाळा आपल्या त्वचेच्या दृष्टीने खूपच हार्ड ठरतो. त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे अनेक त्वचा रोग देखील सुरु होतात. आपण किती देखील व्हॅसलिन लावले, बॉडी लोशन लावले तरी आपल्याला त्याचा जास्त फायदा होत नाही. यासाठी आपण इतरही अनेक उपाय करू शकतो. काही खाण्यापिण्यामध्ये बदल करून किंवा घरगुती काही छोटे उपाय करून हे नक्कीच बरे करू हुकतो. Top stories

याचा जास्त परिणाम दिसतो तो ओठांवर. हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच बऱ्याचदा या ऋतूत लोक ओठ फाटण्याच्या समस्येने त्रस्त असतात. आपले ओठ सर्वात आधी लक्ष वेधून घेतात. त्यामुळे जेव्हा आपले ओठ खराब दिसू लागतात, त्याला तडे जातात, ते कोरडे होतात, त्याची स्किन निघते कधी कधी तर ओठांमधून रक्त देखील येते. यासाठी आपण बरेच उपाय केले तरी पाहिजे तितका फायदा आपल्याला होत नाही. मात्र यासाठीच आता आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ होतील.

ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्याने ओठ कोरडे होणं आणि त्यांना तडे जाणे ही बाब खूप सामान्य आहे. फुटलेले ओठ कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. पण हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कोरडे आणि फुटलेले ओठ केवळ दिसायला अनाकर्षक वाटतातच.

– रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप आणि खोबरेल तेल लवणे देखील देखील चांगले असते. यामुळे नैसर्गिकरित्या ओठ मऊ होतील. तुपातील फॅटी ऍसिडस् ओठांची आर्द्रता टिकवून ठेवतात आणि खोबरेल तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म ओठांचे पोषण करतात.

– ओठांना मध लावणे देखील लाभदायक ठरू शकते. मधामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म ओठांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात

– फाटलेले ओठ टाळण्यासाठी, शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे, पुरेसे पाणी पिणे आणि आपले ओठ तसेच संपूर्ण शरीर हायड्रेटेड ठेवणे देखील गरजेचे आहे.

Lip Care

– हिवाळ्यामध्ये घरातून बाहेर पडण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा कोणतेही मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते.

– ओठांना तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी गुलाबपाणी, कच्चे दूध आणि मध्यापासून घरीच एक DIY क्रीम तयार करून. ती क्रीम लावून ओठांची निगा राखण्यास मदत होईल.

– हिवाळ्यात ओठांवर मृत पेशी जास्त जमा होतात. त्यामुळे दोन-तीन दिवस ओठ स्क्रब करा. मध मिसळून कॉफी पावडरमध्ये मध मिसळून त्याचा वापर स्क्रबर म्हणून करता येतो. साखर आणि लिंबाच्या रसाने देखील ओठांना घासल्यास फायदा होईल.

– काकडीचा रस ओठांवर लावल्याने काळे डाग दूर होतात. लिंबू, बटाटा आणि बीटरूटचा रस रात्री ओठांवर लावून सकाळी ओठ धुतल्यास ओठावरील काळे डाग दूर होतील.

– कोरडे ओठ असणाऱ्यांनी नेहमी लिप बाम लावावा. हिवाळ्यात शक्यतो मॅट लिपस्टिक लावणे टाळा. जर लावायची असेल तर आधी ओठ चांगले मॉइश्चरायझ करून मगच लावावी.

हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे ओठ कोरडे पडतात. त्यांच्यावर एक कडक त्वचेचा थर तयार होतो. त्यामुळे जिभेने ओठ ओले करण्याची, ओठांची साल काढण्याची किंवा ओठांना चावण्याची सवय बंद करा.

===========
हे देखील वाचा : मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे ‘हे’ आहेत फायदे

===========

– हिवाळ्यात ओठांची कोरडी त्वचा काढून टाकण्यासाठी वेळोवेळी एक्सफोलिएट करा. आठवड्यातून एकदा एक्सफोलिएट केल्याने ओठांवरची मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.

– रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावेत आणि त्यावर चांगला लिप बाम लावावा. हे रात्रभर तुमच्या ओठांना पोषण देईल आणि दिवसा त्यांना फाटणे टाळू शकते.

– दररोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावा, त्यामुळे तुमचे ओठ फाटणार नाहीत आणि तुमचे ओठ संपूर्ण हिवाळ्यात गुलाबी आणि मऊ राहतील. Top stories

Original Content is posted on: https://gajawaja.in/know-how-to-take-care-lips-in-winter-use-these-easy-tips-marathi-info/


 

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी