इस्कॉनच्या भाविकांची बांगलादेशमध्ये कत्तल !
यामध्ये इस्कॉनच्या काही पदाधिका-यांचाही समावेश होता. बांगलादेश सरकारनं या पदाधिका-यांना अटक करुन त्यांच्यावर चक्क देशद्रोहाचा आरोप केला आहे. शिवाय इस्कॉन मंदिरातील अनेक भक्तांना पकडून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात येत आहे. आता त्याही पुढे जात एका कट्टरवादी संघटनेनं जिथे इस्कॉन मंदिरातील भाविक दिसतील तिथे त्यांना ठार करा असे जाहीर आवाहन केल्यामुळे बांगलादेशातील हिंदू समाजात खळबळ उडाली आहे. बांगलादेशमध्ये 15 दशलक्षाहून अधिक हिंदू राहतात. बांगलादेशमधील 64 जिल्ह्यांमध्ये हजारो मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरांचा हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. शिवाय इस्कॉनचीही अनेक मंदिरे बांगलादेशमध्ये आहेत. आत्तापर्यंत ही मंदिरे सर्वांसाठी काम करीत होती. इस्कॉनमंदिरातर्फे चालणारी भोजनसेवा ही समाजातील सर्व धर्मांसाठी समान सुविधा देत होती. तसेच आरोग्य शिबीरांमध्येही बांगलादेशच्या हिंदूंसोबत मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी होत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून याच इस्कॉन मंदिरावंर आक्रमण करण्यात येत असून त्यांची जाळपोळ करण्यात येत आहे. (International News)
बांगलादेशच्या चितगाव जिल्ह्यात इस्कॉनचे श्री राधा माधव मंदिर आहे. ढाका येथे इस्कॉन स्वामीबाग मंदिर आहे. खुलना जिल्ह्यातही इस्कॉनचे मंदिर आहे. नोआखली जिल्ह्यात चौमुहानी इस्कॉन मंदिर आहे. राजशाही जिल्ह्यात इस्कॉन मंदिर, प्रेमटोली, आणि इस्कॉन मंदिर, घोरमारा अशी दोन मंदिरे आहेत. आता याच सर्व मंदिरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण या मंदिरातील भाविकांना पकडा आणि मारुन टाका अशी खुली धमकी देण्यात आली आहे. बांगलादेशच्या कट्टरपंथी इस्लामिक गटाने ही धमकी दिली आहे. हेफाजत-ए-इस्लाम हा बांगलादेशमधील कट्टर इस्लामिक गट म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही याच गटाकडून बांगलादेशमधील अन्य हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या एकाही सदस्याला याबाबत अटक किंवा साधी चौकशीही मोहम्मद युनूस यांच्या सरकारनं केली नाही. (Bangladesh ISCKON)
======
हे देखील वाचा : हिजाबबंदीसाठी इराणी तरुणींचे नग्न आंदोलन !
========
आता या हेफाजत-ए-इस्लाम गटानं इस्कॉन सदस्यांना ठार मारण्याचा फतवा काढला आहे. सध्या भारताच्या आश्रयाला आलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ही माहिती दिली असून बांगलादेशमधील हिंदूंना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न व्हावेत, यासाठी आवाहन केले आहे. तस्लिमा नसरीन यांनी दिलेल्या माहितीवरु चिटगाव येथील इस्कॉन मंदिर बंद करण्याची मागणी हेफाजत-ए-इस्लाम या गटानं केली आहे. हे मंदिर बंद झाले नाही, तर यात येणा-या भक्तांना ठार मारण्यात यईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे, इस्कॉनमधील हरे रामा हरे कृष्णा असा जप करण्यासही बंदी घालण्याची मागणी आहे. असे जे करणार नाहीत त्या भक्तांचा शिरच्छेद करण्याची योजना हेफाजत-ए-इस्लाम ची असल्याची माहितीही नसरीन यांनी दिली आहे. इस्कॉन मंदिरे बंद करुन त्यांची जमिन संपादीत करण्याचे उद्दीष्ट या संघटनेचे असल्याची माहिती आहे. इस्कॉन मंदिरांनी या परिसरात मोठ्या सुविधा केल्या असून ते कायम सामाजिक उपक्रम राबवत आहेत, अशा मंदिरांना दहशतवाद्यांकडून येत असलेल्या या खुल्या धमक्यांविरोधात मोहम्मद युनूस गप्प का आहेत, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. (International News) Top stories
Original content is posted on: https://gajawaja.in/bangladesh-isckon-protest-marathi-info/
Comments
Post a Comment