जाणून घ्या तुळशी माळ घालण्याचे फायदे आणि नियम
आजपासून
तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. आपली
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीला धार्मिक,
पौराणिक आणि वैज्ञानिक असे
सर्वच बाजूने मोठे महत्व आहे.
आपल्या देशात तर प्रत्येक घरात
तुळशीचे रोप, झाड असते
म्हणजे असतेच. रोज सकाळी तुळशीला
पाणी घालणे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे ही
आपल्याकडे परंपराच आहे. प्रत्येक घरातील
स्त्रिया ही परंपरा पळतातच. Top Stories.
यासोबतच
तुळशीची पाने खाणे, तुळशीची
माळ घालणे आदी अनेक गोष्टी
भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग
आहेत. तुळशीची माळ देखील प्रत्येकाच्याच
घरात असते. या माळेला तुळशीचे
मणी किंवा तुळशीची जपमाळ या नावाने देखील
ओळखले जाते. या माळेचे देखील
मोठे महत्व आहे आणि तिचे
अनेक फायदे देखील आहेत. ही तुळशी माळ
तुळशीच्या रोपापासून बनवली जाते. आज तुळशी विवाह
साजरा होत आहे. त्यानिमित्ताने
जाणून घेऊया या तुळशी माळेच्या
विविध फायद्यांबद्दल.
तुळशीची
माळ घातल्याने सर्व संकटांपासून मुक्ती
मिळते अशी मान्यता आहे.
या तुळशीच्या माळेचे अनेक धार्मिक गुणधर्म
असण्यासोबतच तुळशीची माळ आरोग्यासाठीही खूप
फायदेशीर आहे. तुळशीची माळ
धारण केल्याने बुध आणि शुक्र
ग्रह मजबूत होतात आणि मन शांत
राहते असे म्हणतात.
तुळशीची
माळ परिधान केल्याने मन शांत होते
आणि आत्मा शुद्ध होतो. ही माळ परिधान
केल्याने शरीर शुद्ध होते,
चैतन्य वाढते. पचनशक्ती, ताप, सर्दी, डोकेदुखी,
त्वचेचा संसर्ग, मेंदूच्या आजार आणि गॅसशी
संबंधित अनेक आजारांमध्ये आराम
मिळतो. तसेच संसर्गामुळे होणा-या आजारांपासून संरक्षण
होते.
तुळशीची
माळ घातल्याने संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून रक्षण होते. तुळस औषधी असून
तिच्यापासून बनवलेली माळ घातल्याने रक्तदाब
आणि पचन सुधारते. ही
माळ घातल्याने शरीरात विद्युत प्रवाह वाढतो. गळ्यात तुळशीची माळ घातल्याने विद्युत
लहरी बाहेर पडतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होत नाही.
तुळशी
माळ गळ्यात घातल्याने ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर दबाव येतो, जो
मानसिक तणावात फायदेशीर ठरतो. तसेच स्मरणशक्ती वाढण्यास
मदत होते. काविळ झाल्यास तुळशीची माळ धारण करणे
लाभदायक मानले जाते. तुळशीची माळ परिधान केल्यास
कोणत्याही वास्तुतील दोष दूर होतात.
तुळशीची
माळ फायदे
– तुळशीची
माळ गळ्यात घातल्यानं मन आणि आत्मा
दोन्ही शुद्ध होतात.
– माणसाची आध्यात्मिक प्रगती होते ज्यामुळे तो
स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो.
– तुळशीची माळ घातल्यानं सन्मान
आणि सौभाग्य लाभतं.
– मनात सकारात्मकता विकसित होते.
– मानसिक शांतता मिळते.
– तुळशी शुद्धीकरण गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. तुळशीची माळ
धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती
दूर राहतात. ही माळ जीवनात
सकारात्मकता आणते.
– तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकाराचा
द्रव आढळतो जे मानसिक ताणाला
दूर करतो. या मुळे आपले
मानसिक आरोग्य चांगले राहते.
– तुळशीची माळ शरीरास स्पर्श
झाल्यामुळे कफ आणि वातदोषां
पासून आराम मिळतो.
==========
हे
देखील वाचा : तुळशी विवाहाचे महत्व आणि कथा
==========
तुळशी
माळ घालण्याचे नियम
– तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने
ती धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यावर
ती परिधान करावी.
– ही माळ परिधान केलेल्या
व्यक्तींना दररोज जप करावा लागतो.
यामुळे भगवान विष्णूची कृपा कायम राहाते.
– तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने
सात्विक अन्न खावे. याचा
अर्थ असा की अन्नात
लसूण, कांदा, मांस आणि मासे
इत्यादींचे सेवन करु नये.
– कोणत्याही परिस्थितीत तुळशीचा माळ शरीरापासून विभक्त
होऊ देऊ नये. Latest marathi news.
Original content is posted on: https://gajawaja.in/tulshi-vivah-2024-know-the-rules-of-wearing-tulsi-mala-and-its-importance-marathi-info/
Comments
Post a Comment