Gudhipadwa : गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ अर्थात गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. अवघ्या काही दिवसातच म्हणजेच 19 मार्च रोजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला आपल्या जीवनात जाणवतील. मग गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय करावे? चला जाणून घ्या. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. याच दरव...