Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज
मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये नानाविध प्रकारचे असंख्य मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील सर्वच मंदिरांची जगामध्ये भरपूर चर्चा होताना दिसते. आपल्याकडील प्रत्येक मंदिर हे खूपच खास आणि वैशिट्यपूर्ण आहे. प्रत्येक पुरातन मंदिराला एक खास पौराणिक इतिहास देखील आहे. याचमुळे या मंदिरांचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक मंदिरं तर त्यांच्या रहस्यमयी गोष्टींसाठी चर्चेत येत असतात. जुन्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर या मंदिरांचे बांधकाम आणि अचंभित करणाऱ्या गोष्टी कायम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यातलेच एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे, जाटोली शिव मंदिर. (Lord shiva) Top Marathi Headlines भारताच्या सर्वात उंच टोकावर अर्थात हिमाचल प्रदेश राज्यात हे जाटोली शिव मंदिर स्थित आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर रहस्यमयी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. जटोली शिव मंदिर, जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या दगडांवर आघात केल्यास डमरूसारखा आवाज ये...