Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जगातील काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार मिळणे अतिशय मानाची आणि भाग्याची गोष्ट समजली जाते. यंदाचा शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कमालीचा गाजत होता. याचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. (Nobel Peace Prize) International News
कारण मागील काही महिन्यांपासूनच ते शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना स्वतःला मिळावा यासाठी ते दावा करत होते. मात्र आज डोनाल्ड ट्रम्प हे तोंडावर पडले आहेत. याचे कारण म्हणजे नुकताच शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारीया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीनं शुक्रवारी ही घोषणा केली. या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र एवढा मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकलेल्या मारिया कोरिना मचाडो यांची संपूर्ण जगामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Marathi News)
मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळीकडे फक्त मारिया कोरिना मचाडो याच झळकत आहेत. यंदाच्या या नोबेल पुरस्कारांकडे संपूर्ण जगाचे आणि खासकरून अमेरिकेचे लक्ष प्रकर्षाने लागले होते. याचे कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून ते शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी किती पात्र आहे आणि यंदा त्यांचा हा नोबेल मिळणार हे सांगितले होते. अशातच मारिया कोरिना मचाडो यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड ट्रम्प तात्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. (Todays Marathi Headline)
आता २०२५ वर्षाचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मारिया कोरिना मचाडो या आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया. मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्ग निवडला. त्यांनी केलेल्या शांततापूर्वक संघर्षासाठी २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याचा येणार आहे, असे नोबेल समितीने सांगितले. ‘व्हेनेझुएलाची आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया मचाडो यांना त्यांच्या देशातील हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि न्यायपूर्ण लोकशाही संक्रमणासाठी केलेल्या धाडसी कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर केलाय. (Top Marathi News)
नोबेल शांती पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना मचाडोंनी गेल्या एका वर्षापासून भूमीगत जीवन जगत असतानाही आपला संघर्ष कायम ठेवला होता. नोबेल समितीने म्हटले की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका असतानाही त्या देशातच राहिल्या. त्यांची निवड लाखो लोकांना प्रेरणा देईल. यासाठी नोबेल समितीने त्यांना “लोकशाहीचा ज्योत जिवंत ठेवणारी धैर्यशील आणि समर्पित शांततेची दूत” असे संबोधले आहे. (Latest Marathi HEadline)
मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
मारिया कोरिना मचाडो २०११ ते २०१४ पर्यंत व्हेनेझुएला राष्ट्रीय सभेद्वारे निवडलेल्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्या व्हेनेझुएलाच्या सध्याच्या सरकारविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मारिया पेशाने इंजिनीयर आहेत. सध्या त्या विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत. मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पुरस्कारापूर्वी अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०२४ मध्ये युरोपियन संघाचा सखारोव पुरस्कारांने त्यांना सन्मानित केले होते. हा युरोपियन संघाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. (Top Marathi Headline)
मारिया यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला. त्या एक औद्योगिक अभियंता आहेत. २०१८ साली बीबीसीच्या १०० सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि २०२५ मध्ये टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. निकोलस मादुरो सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली होती. २०२३ मध्ये अपात्र ठरल्यानंतरही, त्यांनी २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकली, परंतु नंतर त्यांची जागा कोरिना योरिस यांनी घेतली. नोबेल पुरस्कारासोबत मारिया यांना सुमारे ७ कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
नोबेल समितीने मारिया यांच्या नावाची घोषणा करताना सांगितले की, “व्हेनेज्युएला हा आधी अपेक्षाप्रमाणे लोकशाही आणि समृद्ध देश होता. आता एक निर्दयी तानाशाही राज्यात बदलला आहे. जो मानवी आणि आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. आज बहुतेक व्हेनेज्युलाचे नागरिक भयंकर गरीबीमध्ये जगत आहेत. मात्र, दुसरीकडे काही सत्तेसाठी आसुसलेले लोक देशाची मालमत्ता लूटत आहेत. सुमारे ८० लाख लोक देश सोडून गेले आहेत, आणि विरोधकांना धमक्या आणि कैद करणे, त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर दडपशाही करत आहे.” (Top Marathi Headline)
व्हेनेझुएला सरकारने राजकीय हक्कांवर निर्बंध आणले आहेत. तसंच विरोधकांच्या उमेदवारांना बेकायदेशीरपणे अपात्र ठरवले. या क्रूर दडपशाहीच्या विरोधात भूमिगत राहूनही मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचे काम सुरुच ठेवले. मुक्त निवडणुका, कायद्याचे राज्य यासाठी त्या लढा देत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव नोबल शांतता पुरस्कार देणाऱ्या निवड समितीने केलाय. (Top Trending News)
=======
Galapagos Affair : दोघे बेटावर गेले पण ती आली आणि भलतंच घडलं…
=======
दरम्यान यावेळी शांतेतच्या नोबेल पुरस्कारासाठी ३३८ व्यक्ती आणि संस्थांना नामांकन प्राप्त झाले होते. या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देखील होतेच. त्यांच्या नावासाठी अनेक देशांच्या नेत्यांनी समर्थन दिले होते. यात पाकिस्तान, इस्रायल, आर्मेनिया, अजरबैजान, कंबोडिया आणि रवांडा इत्यादी देशांचा समावेश होता. ट्रम्प यांनी ओबामा यांना नोबेल पुरस्कार दिला आणि मी तर अनेक देशांमधील युद्ध थांबवली असेही म्हटले होते. मात्र त्यांना पुरस्कार न मिळता मारिया यांना हा पुरस्कार दिला गेला. (Social News) Latest International News
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/who-is-maria-corina-machado-winner-of-2025-nobel-peace-prize/
Comments
Post a Comment