Temple : २५ लाख दगड फोडून बांधले गेलेले रहस्यमयी कैलास मंदिर

 

भारत देशाची भूमी ही विविध ऐतिहासिक, जाज्वल्य अशा मंदिरांनी पवित्र झाली आहे. या देशाच्या भूमीवर अगणित मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक मंदिर हे आपल्या खास वैशिष्टांसाठी ओळखले जाते. प्रत्येक मंदिराचा आपला एक इतिहास आहे, आपली एक ओळख आहे. अशा या मंदिरांमध्ये एक मंदिर अनेकदा चर्चेचा विषय ठरते आणि ते मंदिर म्हणजे महाराष्ट्र्रातील वेरूळ येथील कैलास मंदिर. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर या मंदिराबद्दल विशेषतः सांगणारे अनेक व्हिडिओ सापडतील. याचे कारण म्हणजे हे मंदिर म्हणजे वैशिष्ट्यांचा खजिना आहे. अनेक खास गोष्टी, रहस्य या मंदिरामध्ये दडलेले आहेत. (Temple) Marathi news

महाराष्ट्र्रातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील वेरूळ लेण्यांमध्ये हे कैलास मंदिर स्थित आहे. हे मंदिर राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला याने आठव्या शतकात बांधले असून, हे एक जागतिक वारसा स्थळ बनले आहे. कैलास मंदिर हे द्रविड शैलीतील मंदिर असून, ते डोंगरातून वरपासून खालपर्यंत कोरुन तयार केले गेले आहे. हे मंदिर दिसायले फारच सुंदर आणि आकर्षक आहे. या मंदिराची भव्यता आणि कोरीव काम इतके सुबक आणि रेखीव आहे की जो हे बघतो तो या ठिकाणाच्या प्रेमात पडतो. हे मंदिर जवळपास १२०० वर्षे जुनं आहे. युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत या लेण्यांचे नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येते. (Marathi News)

एलोराच्या गुफांमध्ये असलेले हे कैलास मंदिर २७६ फूट लांब आणि १५४ फूट रुंद असून, केवळ एकाच दगडावर हे मंदिर उभे आहे. या मंदिराची उंची दोन ते तीन मजली इमारती एवढी आहे. जाणकारांच्या माहितीनुसार या मंदिराच्या निर्माणमध्ये कमीतकमी ४० हजार टन खडक कापण्यात आले होते. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये असलेले हे कैलास मंदिर जगातील एकमात्र असे विशाल शिव मंदिर आहे जे एकच खडक कापून बनवले गेले आहे. या मंदिराची निर्मिती ही ‘आधी कळस मग पाया’, या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. (Todays Marathi Headline)

Temple

इ. स. ७५७ मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत हे मंदिर कोरण्यात आल्याचे बोलले जाते. हिंदू पुराणांमध्ये हिमालयातील पांढऱ्या बर्फात शंकराचे अस्तित्व आहे असे म्हटले आहे. त्यामुळे हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मंदिराला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता असे म्हटले जाते. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात. याला ‘रंगमहल’ असेही म्हणत असत, असे मानले जाते. (Marathi Trending Headline)

लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारे शिल्प कोरण्यात आले असून, मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहे. कैलास मंदिरात हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेले आहे. (Latest Marathi Headline)

हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत. (Marathi Top News)

=======

Kartiki Ekadshi : कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा आणि व्रताचा लाभ मिळवा

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

=======

काही इतिहास संशोधकांच्या मते, हे मंदिर बांधताना एका मोठ्या खडकाला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आले. या खोदकामात जवळपास २० हजार टन दगड फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. याबद्दल आजही आश्चर्य व्यक्त केले जाते. मात्र कैलास मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक दगडी बांधकाम आहे. त्यासाठी हा उरलेला खडक वापरण्यात आला असावा असे अंदाज लावले जातात. हे मंदिर बनवण्यासाठी कमीतकमी १५० वर्ष लागले व कमीतकमी ७००० मजुरांनी यावर काम केले आहे. हे मंदिर म्हणजे इंजिनियरिंगचं अद्भूत उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (Top Trending News) Top stories

कैलास मंदिर हे आठवड्यातील मंगळवार सोडून बाकी इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. कैलास मंदिर पाहण्यासाठी भारतीयांना प्रवेश शुल्क १० रूपये द्यावे लागतात तर विदेशी पर्यटकांना २५० रूपये एवढे शुल्क काढावे लागते. कैलास मंदिर एलोराच्या १६ व्या गुफा मध्ये स्थित आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/know-kailash-temple-chatrapati-sambhaji-nagar-information-and-history/



Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी