Mahashivratri : महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती आणि कथा
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाची देवता म्हणून शिव शंकराला ओळखले जाते. आपल्या धर्मामध्ये मुख्य समजल्या जाणाऱ्या त्रिदेवांपैकी एक म्हणजे शंकर. सृष्टीचा संहारक देव म्हणून भगवान शंकर प्रसिद्ध आहे. याच शिव शंकराचा एक मुख्य सण किंवा दिवस म्हणजे महाशिवरात्र. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. ‘शिवाची महान रात्र’ अर्थात महाशिवरात्र. शिवरात्रीच्या रात्री, भगवान शंकर त्यांचे ‘तांडव’ नृत्य करतात, असे देखील सांगितले जाते. (Lord Shiva)
यावर्षी महाशिवरात्र २६ फेब्रुवारीला अर्थात आज साजरी केली जात आहे. आपल्या जुन्या धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. यासोबतच आजच्या दिवसाची अजून एक मान्यता आहे की, या दिवशी पहिले ज्योतिर्लिंग प्रकट झाले होते. आजचा दिवस हा सर्वच शिवभक्तांसाठी खूपच महत्वाचा आणि मोठा आहे. मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने हा दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी उपवास करतात आणि भगवान शिव शंकरची देवी पार्वतीसह पूजा करतात.(Mahashivratri)
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि याच शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. या काळात शिव स्वत:साठी साधना करतात. या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जातात. (Top Stories)
शंकराच्या मंदिरांमध्ये तर आजच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीला शंकराला दुग्धाभिषेक केला जातो. सोबतच महादेवाची यथासांग मनोभावे पूजा करत बेलपत्र देखील वाहिले जाते. अनेकांकडे तर घरीच शंकराची पिंड तयार केली जाते आणि त्याची पूजा केली जाते. आजच्या दिवशी पांढरे कपडे घालून देवाची पूजा केली जाते. शिवाय दिवसभर ‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र जपला जातो. महाशिवरात्र केवळ भारतातच नाही, तर नेपाळ आणि इतर अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये साजरी केली जाते. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो. (Marathi Latest News)
महाशिवरात्र कथा
एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार मिळाली नाही. संध्याकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला.हे पाहून पारधीला आनंद झाला. तो त्यांच्या दिशेने बाण सोडणार, इतक्यात त्यातील एक हरीण पुढे आले आणि पारध्याला म्हणाले, ‘हे पारधी तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे तर निश्चितच आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे त्यानंतर मी स्वतःच तुझ्यासमोर येऊन उभा राहील’ हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली. (Shiv shankar Festival)
दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज हाताला चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता, त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की, ‘आता मला मार, मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे, तेंव्हा लगेच मादी हरिण पुढे आली आणि तिने म्हंटले ‘त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’.(marathi top News)
लगेचच हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ”आईला नको, आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे” ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशिर्वाद दिला. आणि सर्वांचा उध्दार केला, हरिणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले.
महाशिवरात्र कथा २
समुद्र मंथनाबद्दल तर सगळ्यांच माहित आहे. देव आणि राक्षसांमध्ये झालेल्या या समुद्रमंथनात सृष्टीशी संबंधित आणि तिच्या कल्याणासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी बाहेर आल्या. मात्र याच समुद्रमंथनातुन अतिशय जहाल असे विष देखील बाहेर आले. हे विष संपूर्ण विश्वाला नष्ट करू शकते एवढे ताकदवर होते. म्हणून या विषाला नष्ट करण्यासाठी सर्वांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. तेव्हा सर्वानीच शिवाची आराधना केली आणि हे विष नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच आहे असे त्यांनी सांगितले.
===============
हे देखील वाचा : Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?
===============
विश्वाच्या कल्याणासाठी भवन शिवाने हे हलाहल विष प्राशन करून या ब्रम्हांडाला वाचवले. मात्र या विषाचे प्राशन केल्यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि संपुर्ण देहाचा दाह सुरु झाला. तेव्हा मोठ्या वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्य केले. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. Top stories
Original content is posted on : https://gajawaja.in/mahashivratri-2025-know-all-details-about-this-shiv-festival-marathi-info/
Comments
Post a Comment