Anganewadi : जाणून घ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेची खास माहिती
संपूर्ण कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीची (Shri Bharadi Devi) यात्रा उद्यापासून अर्थात २२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची ही यात्रा कोकणवासियांसाठी खूपच जवळची असते. फक्त कोकणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक या आंगणेवाडीच्या (Anganewadi) यात्रेला येतात. श्री भराडी देवीची यात्रा म्हटल्यावर संपूर्ण कोकणामध्ये उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते. (Anganewadi )
दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा यंदा २२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी संपन्न होणार आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. या यात्रेदरम्यान आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला कोकणातील लोकांसोबतच देशा-परदेशातून देखील लोकं इथे पोहचतात. आंगणेवाडीच्या यात्रेसाठी दरवर्षी देवीला कौल लावून तारीख निश्चित केली जाते. ही तारीख निश्चित करण्याची खूपच जुनी पद्धत आहे. (Shri Bharadi Devi Yatra Anganewadi)
या यात्रेचे भाविकांमधील महत्व पाहता आंगणेवाडीच्या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून देखील विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. या यात्रा काळात सामान्य लोकांसोबतच अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी सुद्धा आवर्जुन आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला हजेरी लावतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या मालवण तालुक्यात मसुरे नावाचे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून याच वाडीत ‘भराडी देवी’ स्थानापन्न आहे. ही देवी भरडावर प्रकट झाल्यामुळे या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान असल्याने या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. (Marathi Top Stories)
आंगणेवाडीच्या भराडी देवीचे महत्त्व खूपच विशेष आहे. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे. तळ कोकणामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर भराडी देवीकडे सर्व भक्तांचे लक्ष लागलेले असते. भराडी देवी हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी देवस्थान असून या देवीच्या उत्सवाला आणि यात्रेला आंगणे कुटुंबीय दरवर्षी येतात. यात्रोत्सवामध्ये आंगणे कुटुंबीयांकडून विविध प्रकारचे धार्मिक विधी देखील केले जातात. (Marathi Latest News)
मुख्य म्हणजे दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो. प्रामुख्याने आंगणे गावातील माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात, महाप्रसाद करतात. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा नैवेद्य देखील खूपच खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. सगळ्यांसाठीचा हा प्रसाद केवळ या आंगणेवाडीच्या महिला बनवतात. (Top Stories)
प्रसादामध्ये भोपळ्याचे वडे, भाजी, भात, वरण याचा समावेश असतो. हा प्रसाद केळीच्या पानावर मांडला जातो. हा प्रसाद देवीला दाखवण्याच्या प्रक्रियेला ‘ ताट लावणं’ असं म्हटलं जातं. देवीच्या नैवद्याचं ताट हिरव्या साडीमध्ये गुंडाळून त्याचं एक गाठोडं तयार केलं जातं. या गाठोड्याची पूजा केली जाते. पूजेनंतर हे गाठोडं डोक्यावर घेऊन मुली देवीच्या मंदिरात जातात. देवीच्या मंदिरात गाठोडं उघडून गार्हाणं म्हटलं जातं.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. दरवर्षी जवळपास १० ते १५ लाख लोकं या यात्रेसाठी आंगणेवाडीमध्ये येतात.
यंदा रेल्वने या यात्रेसाठी सोडलेल्या विशेष गाड्या कोणत्या आहेत ते जाऊन घेऊया.
१) गाडी क्रमांक ०११२९/०११३०: लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष
गाडी क्रमांक ०११२९
लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड ही विशेष ट्रेन २१ फेब्रुवारी २०२५ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री १२:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३०
सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष ट्रेन सावंतवाडी येथून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांदरम्यान थांबेल.
कोचची रचना: १९ एलएचबी कोच ज्यामध्ये फर्स्ट एसी (१), टू-टायर एसी (२), थ्री-टायर एसी (६), स्लीपर (८), जनरेटर कार (२) यांचा समावेश आहे.
२) गाडी क्रमांक ०११३१/०११३२: लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष
गाडी क्रमांक ०११३१
लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेन २२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
थांबे – ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक ०११३२
ही ट्रेन २२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल .
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
कोचची रचना: २२ एलएचबी कोच ज्यामध्ये टू-टायर एसी (१), थ्री-टायर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४), जनरेटर कार (१), एसएलआर (१) यांचा समावेश आहे.
तिकीट बुकिंग:
ट्रेन क्रमांक ०११३० आणि ०११३२ चे आरक्षण ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पीआरएस काउंटर, आयआरसीटीसी वेबसाइट आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झाले आहे.
३) गाडी क्रमांक ०११३४/०११३३: सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड स्पेशल
गाडी क्रमांक ०११३४
ही ट्रेन २३ फेब्रुवारी २०२५ रोजी (रविवार) सायंकाळी ६:०० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल .
=================
हे देखील वाचा : Champions Trophy : इंडिया टीम चॅम्पियन्स ट्रॉफीचा गड राखणार का ?
=================
गाडी क्रमांक ०११३३
ही ट्रेन लोकमान्य टिळक (टी) येथून २४ फेब्रुवारी २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल .
थांबे: कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.
कोचची रचना: २० एलएचबी कोच ज्यामध्ये टू-टायर एसी (१), थ्री-टायर एसी (३), थ्री-टायर एसी इकॉनॉमी (२), स्लीपर (८), जनरल (४), जनरेटर कार (१), एसएलआर (१) यांचा समावेश आहे. Top Stories.
Original content is posted on : https://gajawaja.in/bharadi-devi-anganewadi-yatra-2025-know-all-information-about-yatra-marathi-info/
Comments
Post a Comment