Mahashivratri : महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती आणि कथा
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाची देवता म्हणून शिव शंकराला ओळखले जाते. आपल्या धर्मामध्ये मुख्य समजल्या जाणाऱ्या त्रिदेवांपैकी एक म्हणजे शंकर. सृष्टीचा संहारक देव म्हणून भगवान शंकर प्रसिद्ध आहे. याच शिव शंकराचा एक मुख्य सण किंवा दिवस म्हणजे महाशिवरात्र. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. ‘शिवाची महान रात्र’ अर्थात महाशिवरात्र. शिवरात्रीच्या रात्री, भगवान शंकर त्यांचे ‘तांडव’ नृत्य करतात, असे देखील सांगितले जाते. (Lord Shiva) यावर्षी महाशिवरात्र २६ फेब्रुवारीला अर्थात आज साजरी केली जात आहे. आपल्या जुन्या धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. यासोबतच आजच्या दिवसाची अजून एक मान्यता आहे की, या दिवशी पहिले ज्योतिर्लिंग प्रकट झाले होते. आजचा दिवस हा सर्वच शिवभक्तांसाठी खूपच महत्वाचा आणि मोठा आहे. मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने हा दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी उपवास करतात आणि भगवान शिव शंकरची देवी पार्वतीसह पूजा करतात. (Mahashivratri) पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्...