Thyroid ‘ही’ लक्षणे दिसताय सावधान ! कदाचित तुम्हाला थायरॉईड असू शकतो…

 


आजच्या आधुनिक काळात कोणालाच आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वेळ असला तरी दुसऱ्या कामांमध्ये तो निघून जातो. त्यातही आपली बदलती आणि चुकीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्बवतांना दिसत आहे. यामुळे खासकरून महिलांमध्ये थायरॉईडची (Thyroid) समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.

पुरुषांपेक्षा जास्त महिला थायरॉईड सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते. भारतात थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. भारतात अंदाजे ३२ टक्के लोकं थायरॉईडच्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत,  त्यातील एक म्हणजे ‘हायपरथायरॉईडीझम’ (Hyperthyroidism) आणि ‘हायपोथायरॉईडीझम’ (Hypothyroidism)  (Thyroid)

हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलित झाल्यानंतर उद्भवतो. घशामध्ये थायरॉईड ग्रंथी असते, जी हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते. पण काही कारणांमुळे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्यास सुरुवात होते आणि हार्मोनल असंतुलित होऊन जातात. यामुळे थायरॉईड हा आजार होतो. थायरॉईड झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. मात्र या थायरॉइडची लक्षणं नेमकी कोणती आहेत चला जाणून घेऊया. (Symptoms Of Thyroid )

हायपोथायरॉइडची लक्षणे (Hypothyroidism)

वजन वाढणे, चेहरा आणि पायाला सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे; तसेच महिलांसाठी पाळीमध्ये बदल होणे, केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे आदी लक्षणांचा हायपोथायरॉइडमध्ये समावेश होतो.

Thyroid

हायपर-थायरॉइडची लक्षणे (Hyperthyroidism)

आहार सामान्य असूनही वजन कमी होणे, अतिसार होणे, चिंताग्रस्त होणे, हात व पाय थरथरणे, उष्णतेचा खूप त्रास होणे, स्वभावात तीव्र चढ-उतार, स्लीप अॅप्निया (झोपेत श्वसन बंद होणे), हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धूसर होणे आदी लक्षणांचा समावेश हायपर-थायरॉइडमध्ये होतो.

थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी सोप्या टिप्स (Thyroid Tips )
– थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात आयोडीन, जस्त, जीवनसत्त्व -डी,जीवनसत्त्व – बी, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा आहारात समावेश करा.
– थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात सफरचंद, विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा.
– आहारामध्ये ब्राऊन राइसचा समावेश करा. हा राइस थायरॉईड कमी करण्याचे काम करतो.

=====================

हे देखील वाचा : Indian Army Day आज साजरा होतोय ‘भारतीय सेना दिन’ जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्व

=====================

– थायरॉईड असलेल्या लोकांनी गहू किंवा बेकरी पदार्थांचा आहारात समावेश करू नये. यामुळे हा आजार आणखीन वाढू लागतो.
– बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्स थायरॉईडसाठी योग्य आहेत. त्यामुळे या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

(टीप : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) Top stories.

Original content is posted on: https://gajawaja.in/know-the-thyroid-symptoms-and-remedies-marathi-info/


Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first