पावसाळ्यातील स्किन केअर रुटीन करताना या गोष्टी ठेवा लक्षात
पावसाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो करणे अत्यावश्यक असते. अन्यथा त्वचेसंदर्भात काही समस्या उद्भवू शकतात.
Skin Care Routine in Monsoon : पावसाळ्यात बाहेरील वातावरण अत्याधिक ओलसर राहत असल्याने त्वचा तेलकट होण्याची समस्या बहुतांश महिलांना उद्भवते. यामुळेच त्वचेवर पिंपल्सही येतात. अशातच पावसाळ्यात त्वचेची खास काळजी करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही त्वचेसंदर्भातील काही समस्यांपासून दूर राहू शकता. पावसाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो करताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षत ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
माइल्ड क्लिंजरचा वापर करा
चेहऱ्यावरील चिकटपणा दूर करण्यासाठी माइल्ड फेस वॉशचा वापर करू शकता. या फेस वॉशचा दररोज वापर केल्याने चेहऱ्यावरील धूळ आणि घाण दूर होण्यास मदत होईल. याशिवाय क्लिजिंगच्या कारणास्तव चेहऱ्यावरील पोर्सही खुले होतात, जे आपल्या त्वचेसाठी महत्वाचे आहे. क्लिजिंगमुळे चेहऱ्यावरील तेलकट आणि चिकटपणा दूर होऊ शकतो. माइल्ड क्लिंजरचा वापर दररोज करू शकता.
रोज वॉटर आणि टोनरचा वापर
फेस वॉश केल्यानंतर चेहऱ्यावरील रोमछिद्र खुले होतात. यामुले धूळ आणि घाण दूर होण्यास मदत होते. अशातच चेहऱ्याला गुलाब पाण्याचा वापर करू शकते. हे नॅच्युरल टोनरसारखे काम करते. याशिवाय मार्केटमध्ये मिळणारे एक उत्तम टोनरचाही वापर करू शकता.
चिकट मॉइश्चराइजरचा वापर करणे टाळा
पावसाळ्यात बाहेरील वातावरण ओलसर असल्याने चेहरा तेलकट होतो. अशातच चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चराइजर लावणे अत्यावश्यक असते. यामुळे चेहरा हाइड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावर असे मॉइश्चराइजर लावावे जे कमी तेलकट आणि चिकट असेल. अन्यथा चेहऱ्यावर डाग-पिंपल्स निर्माण होऊ शकतात.
भरपूर प्रमाणात पाणी प्या
कोणताही ऋतू असो तुमच्या शरिराला पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. यामुळे शरिर हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय चेहरा टवटवीत आणि फ्रेश राहतो. त्वचा हेल्दी राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे दिवसभरात कमीत कमी 5-6 लीटर पाणी प्यावे. (Skin Care Routine in Monsoon)
आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी
ग्लोइंग त्वचेसाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासह आठ तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरिरातील स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या हळूहळू कमी होऊ लागतात. शरिर आणि मेंदूच्या योग्य कामासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठीही झोप महत्वाची आहे.
Comments
Post a Comment