शरद पवार अजितदादांना जागा देतील ?
Marathi news लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या बेतात आहे. राज्यात सहा प्रमुख पक्ष (काँग्रेस, भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस व दोन शिवसेना) असले तरी खरी उत्सुकता एकाच पक्षाच्या दोन गटांबाबत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, कारण शिवसेना फुटून तिचे दोन गट झाले असले तरी त्या गटांमध्ये आता स्पष्ट सीमा रेखा ओढली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने जोरदार यश मिळविले असले, तरी खरी शिवसेना मिळालेल्या एकनाथ शिंदे यांनाही अगदीच नामुष्की पत्करावी लागलेली नाही. त्यांनाही बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना आपले चंबुगबाळे आवरून परत शिवसेनेत जावे लागणार का, असा प्रश्न कोणी विचारत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण मात्र वेगळे आहे. (Pawar vs Pawar) तिथे अजित पवार यांना पक्षाची ताबेदारी आणि चिन्ह मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यश शरद पवार यांना मिळाले. नुसते यश नाही मिळाले तर अजित पवार यांना अत्यंत नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यांची स्वतःची पत्नी बारामतीत पराभूत झाली, तर पक्षाचा केवळ एक ख...