पावसाळ्यात हात-पाय काळवंडलेत? करा हे घरगुती उपाय

 

पावसाळ्यात हात-पाय काळवंडलेल्या समस्येवर घरगुती उपाय काय हे आज जाणून घेणार आहोत.


skin care mistakes

Marathi news Tan Skin in Monsoon : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा टॅन होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. हीच समस्या पावसाळ्यातही काहींना होते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होण्यासह हात-पायही काळवंडले जातात. अशातच चारचौघांमध्ये जाताना मेकअप अथवा फूल हँड कपडे परिधान करावे लागतात. याच समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….

बेसनच्या पीठाचा वापर
ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, बेसनाच्या पीठाचा वापर करुन तुम्ही हात-पाय काळवंडले असतील तर या समस्येपासून दूर राहू शकता. बेसनाच्या पीठात नारळाचे तेल आणि दूधाची मलई मिक्स करुन पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट काळवंडलेल्या त्वचेच्या येथे लावा. बेसनाच्या पीठाच भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने तुम्ही त्वचेसाठी त्याचा वापर करू शकता. नारळाच्या तेलामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होते. केसांसाठी खरंतर, नारळाचे तेल उत्तम मानले जाते. याशिवाय मलई त्वचेला मऊ करण्यास मदत करते.

Organic Besan (Gram) Flour

सामग्री
-2 चमचे बेसनाचे पीठ
-2 चमचे नारळाचे तेल
-1 चमचा मलई

अशाप्रकारे करा वापर
-एका वाटीत बेसनाचे पीठ घ्या
-बेसनाच्या पीठात नारळाचे तेल आणि मलई मिक्स करा
-पेस्ट काळंडलेल्या हातापायाच्या त्वचेभोवती लावा
-20 मिनिटांनंतर पेस्ट स्वच्छ पाण्याने धुवा (Tan Skin in Monsoon)
-याशिवाय पेस्ट चेहऱ्याच्या त्वचेलाही लावू शकता. यामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होईल. Top stories.

Original content is posted on: https://gajawaja.in/tan-skin-in-monsoon-home-remedies/


Comments

Popular posts from this blog

If using a room heater, read this first

20 year old ghee to be used for Lord Ram's aarti

Himalayan gold hit by climate.