जाणून घ्या कोथिंबीरीचे सेवनाचे चमत्कारिक फायदे
Top stories भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वात शेवट प्रत्येक स्त्री आवर्जून आणि हक्काने फ्रीमध्ये मागते ती कोथिंबीर. आज जरी कोथिंबीर फ्री मिळत नसली तरी छान, फ्रेश कोथिंबीर बघून प्रत्येकालाच ती घ्यायचा मोह होतो. मोठ्या प्रेमाने आपण तिला नीट निवडून ठेवतो. आपला स्वयंपाक कोथिंबीरशिवाय नेहमीच अपूर्ण असतो. प्रत्येक भाजीत शेवट कोथिंबीर जातेच. मोठमोठ्या शेफपासून आपल्या सर्वसामान्य गृहिणींपर्यंत प्रत्येकाचीच पसंती कोथिंबिरीला मिळते. (Coriander Benefits)
ही कोथिंबीर फक्त सजावटीसाठी नसते बरं का. तिच्यापासून देखील अतिशय वेगवेगळी चविष्ट पदार्थ बनवले जातात. अशी ही कोथिंबीर चवीला जितकी सुंदर असते तितकीच ती आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी देखील लाभदायक असते. या कोथिंबीरीचे आपल्या शरीरावर होणारे विविध फायदे आपण जाणून घेऊया.
कोथिंबीरीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, कार्बोहायड्रेट, चरबी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, सेलेनियम, मॅंगनीज, सोडियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. सोबतच कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील मुबलक असतात. (Coriander Benefits)
- कोथिंबीर खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होऊन पचनशक्ती वाढवते. कोथिंबीरची पानं ताकासोबत घेतल्याने अपचन, मळमळ अशा समस्यांपासुन आराम मिळतो. अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकुन प्यायल्याने पोट दुखीपासुन आराम मिळतो.
- कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात जे पचन सुधारण्यास, चयापचय वाढवण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
- दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये 10 ग्राम मिश्री आणि आर्धी वाटी पाणी मिसळून हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
- कोथिंबिरीच्या नियमित सेवनामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- कोथिंबीरमध्ये आपल्या शरीराला पोषक आणि उपयोगी अशी अनेक जीवनसत्त्वे असतात. यात असलेले व्हिटॅमिन के हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि जखमा भरून येण्यासाठी खूप चांगले आहे.
- खोकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री समान प्रमाणात मिळवुन बारीक करून हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिसळून नियमित रुग्णाला दिल्याने आराम मिळतो.
- रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.
- डोळ्यांची आग होणे, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे, डोळे कोरडे होणे आदी विविध डोळ्यांच्या विकारावर कोथिंबीर उपयोगी आहे. या कोथिंबिरीचा रस काढून त्यात ४-५ चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा आणि ते पाणी डोळ्यात २-३ थेंब घालावे.
- कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
=======
हे देखील वाचा : पावसाळ्यात डोक्यात सतत खाज येते? करा हे घरगुती उपाय
=======
- कोथिंबीरमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स गुणांमुळे त्वचेच्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते. चेहऱ्यावरील मुरूमं, काळे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे त्वचेवर येणारे रॅश कमी होतील.
- कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूपच उत्तम आहे. मधुमेह रूग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. marathi news
Comments
Post a Comment