वेटिंग तिकिटाच्या माध्यमातून प्रवास केल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम
वेटिंग तिकीटाच्या माध्यमातून आता प्रवास केल्यास दंडात्मक कार्यवाही केली आहे. याबद्दलचा नवा नियम नुकताच भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Marathi news Indian Railway New Rule : भारतीय रेल्वेने नुकत्याच आपल्या वेटिंग तिकीटाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी नवा नियम जाहीर केला आहे. आतापर्यंत ज्या व्यक्तींकडे कंन्फर्म तिकीट नसायचे अथवा आरएसी असायचे ते स्लीपर अथवा एसी कोचच्या माध्यमातीन वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करायचे. यामुळे कोचमध्ये आरक्षित तिकीटावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागायचा. याशिवाय कोचमध्ये गर्दीही वाढली जायची. अशातच रेल्वेने वेटिंग तिकीटासंदर्भात नवा नियम काढला आहे.
दंडात्मक कार्यवाही होणार
भारतीय रेल्वेकडून कंन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास केल्यास प्रवाशाच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यक्तीवर 440 रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. याशिवाय टीटी प्रवाशाला गंतव्य स्थानकाच्या आधी कुठेही कोचचा खाली उतरवू शकतो याशिवाय टीटीकडून प्रवाशाला जनरल डब्यातही पाठवले जाऊ शकते. एवढेच नव्हे वेटिंग तिकीट असल्यास स्लिपर कोचमधून प्रवास केल्यास व्यक्तीवर 250 रुपयांचा दंड लावत त्याला पुढील स्थानकात उतरवले जाणार आहे.(Indian Railway New Rule)
वेटिंग तिकीट असल्यास प्रवास शक्य आहे?
रेल्वेच्या नियमानुसार, वेटिंग लिस्टच्या माध्यमातून प्रवास करणे अवैध आहे. दरम्यान, तिकीट विंडो काउंटरवरुन घेतले असल्यास तुम्ही वेटिंग लिस्टच्या तिकीटावर जनरल डब्यातून प्रवास करू शकता. पण ऑनलाइन अथवा ई-तिकीटावेळी वेटिंग तिकीट मिळाल्यास प्रवास करता येणार नाही. तुमचे वेटिंग तिकीट ऑनलाइन काढले असल्यास चार्ट तयार झाल्यानंतर आयआरसीटीसीकडून आपोआप तिकीट रद्द करत तिकीटाचे रिफंड प्रवाशाला दिले जाते. रिफंड रक्कम परत मिळण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. Top stories
Comments
Post a Comment