आयुष्मान कार्डच्या माध्यमातून रुग्णालयाचा मोफत उपचारासाठी नकार? करा या क्रमांकावर फोन
आयुष्मान भारत योजनेसंबंधित तुम्हाला तक्रार नोंदवता येते. यासाठी टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध करुन दिला आहे. अशातच आयुष्मान कार्डच्या माध्यमातून रुग्णालयाकडून मोफत उपचार दिले जात नसल्यास काय करावे अशी चिंता सतावत असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Ayushman Card : देशातील गरिबांसाठी शासनाने रुग्णालयात त्यांना मोफत उपचार मिळावेत म्हणून आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीचे एक कार्ड तयार केले जाते. त्याला आयुष्मान कार्ड असे म्हटले जाते. या कार्डच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी रुग्णालात उपचार करता येऊ शकतात. आयुष्मान योजनेअंतर्गत देशातील अनेकांनी आपले नाव नोंदवले आहेत. जेणेकरुन रुग्णालयात उपचारासाठी कामी येईल.
काही वेळेस असे होते की, आयुष्मान योजनेअंतर्गत कार्डधारकाला रुग्णालयाकडून मोफत उपचार देण्यासाठी नकार दिला जातो. अशातच आयुष्मान कार्डधारकाला आपल्या शिखातील पैसे रुग्णाच्या उपचारासाठी द्यावे लागतात. खरंतर, कोणतेही रुग्णालय आयुष्मान कार्डधारकाला त्याअंतर्गत उपचार देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. याशिवाय कार्डधारकाला काहीवेळेस असे झाल्यानंतर काय करावे याची फारशी माहिती देखील नसते.
कुठे करावी तक्रार?
आयुष्मान योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णावर पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येऊ शकतात. अशातच रुग्णालयाने मोफत उपचारासाठी नकार दिल्यास शांत बसू नका. तुम्ही टोल फ्री क्रमांक आणि पोर्टलच्या माध्यमातून तक्रार दाखल करु शकता. व्यक्तीने 14555 क्रमांक हा भारत योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील टोल फ्री क्रमांक आहे. यावर देशातील कोणत्याही राज्यात राहणाऱ्या नागरिकाला तक्रार करता येऊ शकते. तक्रार तुम्ही देशातील हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्येही करू शकता.
राज्यातील टोल फ्री क्रमांक
वेगवेगळ्या राज्यांसाठी टोल फ्री क्रमांक दिले आहेत. उत्तर प्रदेशात राहणाऱ्यांसाठी 180018004444, मध्य प्रदेशातील स्थानिकांसाठी टोल फ्री क्रमांक 18002332085 हा आहे. अशाप्रकारे तुमच्या राज्यातीलही एक टोल फ्री क्रमांक दिलेला असेल ज्यावर तुम्ही तक्रार करु शकता. (Ayushman Card)
पोर्टलवरही करता येईल तक्रार
तुम्ही टोल फ्री क्रमांकाएवजी पोर्टलच्या माध्यमातूनही तक्रार करू शकता. यासाठी https://cgrms.pmjay.gov.in/GRMS/loginnew.htm लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे REGISTER YOUR GRIEVANCE ऑप्शनवर क्लिक करुन तक्रार नोंदवता येईल.
Comments
Post a Comment