Posts

Showing posts from June, 2024

लहान-लहान गोष्टीवरुन मुलं रडतात? पालकांनी करा हे काम

Image
  तुमचे मुलं लहान-लहान गोष्टीवरुन रडत असल्यास त्याला भावनात्मक रुपात मजबूत बनवण्यासाठी पालाकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर... Parenting Tips  : मुलांचे पालनपोषण करणे सोपे नसते. मुलांना प्रत्येक प्रकारे मजबूत बनवणे फार गरजेचे असते. केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही मुलं मजबूत असावीत. पण काही मुलांना सतत रडण्याची समस्या असते. यामुळे मुलं काही गोष्टी करण्यासाठीही घाबरात. अशातच मुलांना मजबूत बनवण्यासाठी पालकांनी काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर… प्रत्येक काम व्यवस्थितीत होत नसल्यास ज्यावेळी तुमचे मुलं एखाद्या गोष्टीवर रडत असल्यास समजून जा प्रत्येक गोष्ट त्याच्या मनानुसार होत नाहीये. स्थितीसोबत मॅनेज करणे गरजेचे आहे. मुलांना असे शिकवा की, प्रत्येक स्थितीत मजबूत कसे राहायचे. याशिवाय समस्येच्या काळात कसे रिअॅक्ट करावे. मुलाला बोलण्याची संधी द्या काही पालक मुलांना अधिक बोलू देत नाहीत. यामुळेच मुलं त्यांच्या भावना कधीच मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. अशातच मुलं भावनात्मक मजबूत होत नाहीत. यामुळे मुलांना बोलण्याची संधी द्या. आत्मविश्वास वाढव...

आयुष्मान कार्डच्या माध्यमातून रुग्णालयाचा मोफत उपचारासाठी नकार? करा या क्रमांकावर फोन

Image
  आयुष्मान भारत योजनेसंबंधित तुम्हाला तक्रार नोंदवता येते. यासाठी टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध करुन दिला आहे. अशातच आयुष्मान कार्डच्या माध्यमातून रुग्णालयाकडून मोफत उपचार दिले जात नसल्यास काय करावे अशी चिंता सतावत असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Ayushman Card :  देशातील गरिबांसाठी शासनाने रुग्णालयात त्यांना मोफत उपचार मिळावेत म्हणून आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीचे एक कार्ड तयार केले जाते. त्याला आयुष्मान कार्ड असे म्हटले जाते. या कार्डच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी रुग्णालात उपचार करता येऊ शकतात. आयुष्मान योजनेअंतर्गत देशातील अनेकांनी आपले नाव नोंदवले आहेत. जेणेकरुन रुग्णालयात उपचारासाठी कामी येईल. काही वेळेस असे होते की, आयुष्मान योजनेअंतर्गत कार्डधारकाला रुग्णालयाकडून मोफत उपचार देण्यासाठी नकार दिला जातो. अशातच आयुष्मान कार्डधारकाला आपल्या शिखातील पैसे रुग्णाच्या उपचारासाठी द्यावे लागतात. खरंतर, कोणतेही रुग्णालय आयुष्मान कार्डधारकाला त्याअंतर्गत उपचार देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. याशिवाय कार्डधारकाला काहीवेळेस असे झाल्यानंतर...

चक्क हत्तीणीनं दिला जुळ्या बाळांना जन्म

Image
  थायलंड या देशाला त्याच्या संस्कृतीसाठी ओळखले जाते. जगभरातून पर्यटक थायलंडमध्ये येतात.  येथील निसर्ग, विस्तृत समुद्र किनारे आणि जंगले ही पर्यटकांच्या आवडीची स्थाने आहेत. सोबत थायलंडमधील हत्तींसाठी केलेले विशेष केंद्रही पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी असते.  आता याच थायलंडमधील हत्ती सुविधा केंद्रामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. त्याची चर्चाच एवढी झाली की, थायलंडच्या या हत्ती सुविधा केंद्राला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दुप्पटीनं वाढली आहे. (Thailand Elephants) तर या थायलंडमधील हत्ती सुविधा केंद्रातील एका हत्तीणीनं चक्क जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.  ही आत्तापर्यंतची सर्वात आश्चर्यकारक घटना म्हटली जाते. ज्या हत्तीणीला हे दुसरं बाळ झालं, तिलाही हा प्रकार नवीन होता.  एका पिल्लाला गोंजारत असलेल्या हत्तीणीला काहीवेळानं दुसरं पिल्लू झाले. त्याला पहाताच ही हत्तीणही गोंधळून गेली. हत्तींना जुळे होणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.  त्यामुळे या जुळ्या हत्तीच्या पिल्लांना पहाण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. (Thailand Elephants)   थायलंडमध्ये...

म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री

Image
  रत्नागिरी जिल्ह्यामधील थिबा पॅलेस आठवतो का ?  ब्रिटीशांनी म्यानमारचा राजा थिबा याचा पराभव करुन त्याला कैद केलं.  त्या थिबा राजाला तिथेच म्यानमारमध्ये न ठेवता ब्रिटीश त्याला रत्नागिरीला घेऊन आले.  त्याला ज्या वाड्यात ठेवले त्याला थिबा पॅलेस म्हणून ओळख मिळाली. पुढे काही वर्षांनी म्यानमार ब्रिटीशांपासून मुक्त झाले.  स्वातंत्र्य मिळाले तरी म्यानमार राजेशाही, लष्कराची सत्ता, बंडखोरांचे हल्ले या कारणामुळे गाजत राहिले आहे.  आता याच म्यानमारनं घेतलेली एक भूमिका चर्चेत आली आहे. (Myanmar) जगात २४ व्या क्रमांकाचा मोठा देश म्हणून म्यानमारकडे बघितले जाते. वास्तवात हा देश कायम बंडखोर आणि लष्करी सत्ता यांच्यातील झगड्याचे ठिकाण झाला आहे.  पेट्रोलियम ,  शिसे ,  जस्त ,  तांबे आणि टंगस्टन या खनिजांनी संपन्न असेल्या म्यानमारचा अद्याप विकास झालेला नाही, त्यालाही तेथील अस्थिरता कारणीभूत आहे.  आता याच म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री झाली आहे.  गेल्या आठवड्यात ,  लष्करी गुप्तचर संचालनालयाचे मेजर-जनरल चरणजित सिंग देवगन यांच्या नेतृत्...

२० आणि २१ जून रोजी हा नजारा बघता येणार

Image
  गेल्या दोन महिन्यात अनेक खगोलीय घटना घडत आहेत.  या घटना वैशिष्टपूर्ण असून पुढील अनेक वर्षात अशा घटना प्रत्यक्ष डोळ्यांना बघता येणार नाहीत. नुकतीच सहा ता-यांची अनोखी परेड अवकाशात पाहता आली.  लाखो नागरिकांनी ही परेड बघितली.  तशीच एक वैशिष्टपूर्ण घटना आता अवकाशात घडणार आहे.  २० आणि २१ जून रोजी हा नजारा बघता येणार आहे.  ही घटना म्हणजे, स्टॉबेरी मून असणार आहे.  म्हणजेच अवकाशात दिसणारा चंद्र हा  स्ट्रॉबेरी  च्या रंगातील असणार आहे.  या चंद्राला स्टॉबेरी मून आणि हनी मून असेही म्हणतात. (Moon) २१ जून रोजी पौर्णिमा असून त्यादिवशीचा पूर्ण चंद्र हा स्ट्रॉबेरी मून असणार आहे. या दिवशी, चंद्राचा रंग हलका पिवळा आणि हलका लाल असणार आहे.  पृथ्वीवरुन हा रंग स्ट्रॉबेरीसारखा दिसेल.  याशिवाय या दिवशी चंद्रप्रकाश देखील तेजस्वी असणार आहे.  चंद्राचा प्रकाश इतका तेजस्वी असेल की जणू तो दिवस आहे, असा भास होईल. या घटनेला ‘स्ट्रॉबेरी मून‘ म्हणतात. चंद्र फिकट गुलाबी रंगाचा असेल आणि या दिवसापासून युरोप आणि अमेरिकेत उन्हाळा सुरू होईल....

कामाख्या देवीच्या अंबुबाची मेळ्यातील चमत्कारिक गोष्टी

Image
  आसामची राजधानी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिराबाबत अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात.  त्यापैकीच एक म्हणजे, या मंदिरात होणारा अंबुबाची मेळा.  हा अंबुबाची मेळा स्त्री शक्तीचे प्रतिक मानला जोता.  पाच दिवसांच्या या मेळ्यात जगभरातील देवीचे भक्त आणि तांत्रिक मोठ्या संख्येने यातात.  कामाख्या देवीला येणा-या वार्षिक पाळीचा हा उत्सव महिलांसाठी मोठा महत्त्वाचा असतो.  कामाख्या मंदिर हे तंत्रिक पूजेसाठी सर्वात महत्त्वाचे मंदिर मानले जाते.  तांत्रिकांची देवी म्हणूनही देवीची ख्याती आहे.  आता याच देवीचा २२ जून पासून अंबुबाची मेळा भरत आहे.  यासाठी कामाख्या मंदिर परिसरात आत्तापासूनच देशभरातील देवीच्या भक्तांनी गर्दी केली आहे. (Kamakhya Devi)  आसामामधील कामाख्या मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या मंदिरात देवीची पूजा केली जाते.  दरवर्षी पावसाळ्यात या देवीची प्रतिष्ठापना केली जाते. हा मेळा दरवर्षी महावारीच्या वेळी आयोजित केला जातो. या जत्रेत दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. जत्रेनंतर भाविकांना प्रसाद म्हणून ओले कापड दिले...

WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याची सोपी ट्रिक

Image
  व्हॉट्सअॅप  कॉल रेकॉर्डिंग करायेच असल्यास आणि थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यायची नसल्यास ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरील कॉल कोणत्याही समस्येशिवाय रेकॉर्ड करू शकता. यासाठी एक सोपी ट्रिक फॉलो करावी लागणार आहे. Whatsapp  Call Tricks   : एखाद्याचा व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करायचा असल्यास बहुतांशजण थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. अशातच काहीवेळेस थर्ड पार्टीच्या अॅपमुळे तुमच्या प्रायव्हेसीला धोका निर्माण होतो. यामुळे आता थर्ड पार्टी अॅप नव्हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच कॉल रेकॉर्ड करू शकता. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याची प्रोसेस सविस्तर…. व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड कसा करावा? कोणत्याही व्हॉट्सअॅप कॉलचे रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा. -ज्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉल येईल अथवा एखाद्याला तुम्ही कॉल करण्याआधी फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरु करा. -फोन रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर यामध्ये साउंड ऑप्शन दाखवला जाईल तेथे तुम्ही Media and Mic च्या ऑप्शनवर क्लिक करा. -यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक क...

ॲमेझॉन जंगलात सोशल मिडियाचा बोलबाला

Image
  जगातील सर्वात  मोठे जंगल क्षेत्र म्हणून ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलाचा उल्लेख करण्यात येतो. ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेच्या आसपासच्या भागात पसरलेले हे जंगलक्षेत्र ॲमेझॉन (Amazon) नदीच्या भागात आहे. हे जंगल एवढे मोठे आहे की, जवळपास नऊ देशांच्या हद्दीत त्याची व्याप्ती आहे. या जंगलात सर्वात जास्त जैवविविधता आहे. याशिवाय या ॲमेझॉन जंगलात ४०० च्या वर आदिवासी जमाती राहत असल्याची माहिती आहे. यापैकी काही जनजातींची माहितीही उपलब्ध नाही. या जनजाती आत्तापर्यंत संपूर्णपणे जंगलावर अवलंबून होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून ॲमेझॉन (Amazon) जंगलामध्ये बदल होत आला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. तसेच येथील प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यातच या जंगलाला मोठी आग लागून मोठ्या प्रमाणात वृक्ष हानी झाली. या सर्वांमुळे या जंगलात राहणा-या मनुष्य वसाहतींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. तर काहींना आधुनिक सुविधा देऊन त्यांना इतर समाजाबरोबर मिसळण्याची संधी देण्यात आली. मात्र या सर्व उपाययोजनांमुळे ॲमेझॉन जंगलातील आदिवासी समाजावर विपरित परि...

जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज

Image
  जून महिन्याची  सुरुवात झाली असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक धमाकेदार सीरिज प्रदर्शित होणार आहेत. याचीच लिस्ट आपण पाहणार आहोत. OTT Platform Web Series : मे महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. पण बहुप्रतिक्षित अशा काही वेब सीरिज जून महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया यंदाच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिजची लिस्ट सविस्तर…. द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4 द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4 सीरिज येत्या 5 जूनला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही एक अॅनिमिटेड वेब सीरिज आहे. याचा गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रेलर लाँच करण्यात आला होता. तो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये सीरिजची उत्सुकता अधिक वाढली होती. स्वीट टूथ सीझन 3 स्वीट टू सीझनचा तिसरा सीझन लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या सीरिजच्या कथेत एका जगात व्हायरसमुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दाखवले आहे. यामुळे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कमी झाल्याचे दिसते. याशिवाय एका लहान मुलाचे शरिर हरणाचे असून उर्वरित शरिर व्यक्तीचे आहे. गुल्लक सीझन 4 गुल्लकचे आधी तीन सीझन प्र...

प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स

Image
  दीर्घकाळ एकच कुंड्या रोपट्यांसाठी वापरल्यानंतर त्या खराब किंवा अस्वच्छ होतात. अशातच प्लास्टिकच्या कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या झटपट स्वच्छ कशा करायच्या याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.... Home Gardening Tips  : गार्डनिंग करणे बहुतांशजणांना आवडते. अशातच घराच्या अंगणात, टेरेसवर अथाव विंडोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपटी लावली जातात. सध्या कलरफुल प्लास्टिकच्या कुंड्या वापरण्याचा ट्रेण्ड आहे. पण रोपट्यांची जशी काळजी घेतली जाते त्याप्रमाणे कुंड्या देखील स्वच्छ करणे फार महत्त्वाचे असते. यासाठी पुढील काही टिप्स वापरू शकता. मीठाचा वापर करा प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. सर्वप्रथम कुंडीची बाहेरील बाजू स्वच्छ करून ध्या. यानंतर एका भांड्यात कोमट पाणी आणि मीठ मिक्स करा. यामध्ये कापड भिजवून प्लास्टिकची कुंडी स्वच्छ करा. डिटर्जेंटचा वापर करा दीर्घकाळ सातत्याने एकच प्लास्टिकच्या कुंड्या वापरल्याने त्या खराब होऊ लागतात. अशातच कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सूती कापड अथवा जुने मोजे यांचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत दोन चमचे व्हिनेगर घ्या आणि कापडाच्या ...