प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
दीर्घकाळ एकच कुंड्या रोपट्यांसाठी वापरल्यानंतर त्या खराब किंवा अस्वच्छ होतात. अशातच प्लास्टिकच्या कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या झटपट स्वच्छ कशा करायच्या याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
Home Gardening Tips : गार्डनिंग करणे बहुतांशजणांना आवडते. अशातच घराच्या अंगणात, टेरेसवर अथाव विंडोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपटी लावली जातात. सध्या कलरफुल प्लास्टिकच्या कुंड्या वापरण्याचा ट्रेण्ड आहे. पण रोपट्यांची जशी काळजी घेतली जाते त्याप्रमाणे कुंड्या देखील स्वच्छ करणे फार महत्त्वाचे असते. यासाठी पुढील काही टिप्स वापरू शकता.
मीठाचा वापर करा
प्लास्टिकच्या कुंड्या स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. सर्वप्रथम कुंडीची बाहेरील बाजू स्वच्छ करून ध्या. यानंतर एका भांड्यात कोमट पाणी आणि मीठ मिक्स करा. यामध्ये कापड भिजवून प्लास्टिकची कुंडी स्वच्छ करा.
डिटर्जेंटचा वापर करा
दीर्घकाळ सातत्याने एकच प्लास्टिकच्या कुंड्या वापरल्याने त्या खराब होऊ लागतात. अशातच कुंड्या स्वच्छ करण्यासाठी सूती कापड अथवा जुने मोजे यांचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत दोन चमचे व्हिनेगर घ्या आणि कापडाच्या मदतीने कुंडी स्वच्छ करा. (Home Gardening Tips)
गोणपाटचा वापर
प्लास्टिकच्या कुंड्यांवरप्लास्टिकच्या कुंड्यांवर रोपट्यांमधील माती चिकटल्याने ते अस्वच्छ होतात. अशातच तुम्हाला प्लास्टिकची कुंडी स्वच्छ करायची असल्यास गोणपाट ओलसर करुन त्याने कुंडी स्वच्छ पुसून घ्या.
Comments
Post a Comment