म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री
रत्नागिरी जिल्ह्यामधील थिबा पॅलेस आठवतो का ? ब्रिटीशांनी म्यानमारचा राजा थिबा याचा पराभव करुन त्याला कैद केलं. त्या थिबा राजाला तिथेच म्यानमारमध्ये न ठेवता ब्रिटीश त्याला रत्नागिरीला घेऊन आले. त्याला ज्या वाड्यात ठेवले त्याला थिबा पॅलेस म्हणून ओळख मिळाली. पुढे काही वर्षांनी म्यानमार ब्रिटीशांपासून मुक्त झाले. स्वातंत्र्य मिळाले तरी म्यानमार राजेशाही, लष्कराची सत्ता, बंडखोरांचे हल्ले या कारणामुळे गाजत राहिले आहे. आता याच म्यानमारनं घेतलेली एक भूमिका चर्चेत आली आहे. (Myanmar)
जगात २४ व्या क्रमांकाचा मोठा देश म्हणून म्यानमारकडे बघितले जाते. वास्तवात हा देश कायम बंडखोर आणि लष्करी सत्ता यांच्यातील झगड्याचे ठिकाण झाला आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे आणि टंगस्टन या खनिजांनी संपन्न असेल्या म्यानमारचा अद्याप विकास झालेला नाही, त्यालाही तेथील अस्थिरता कारणीभूत आहे. आता याच म्यानमारच्या राजकरणात भारत सरकारची एन्ट्री झाली आहे.
गेल्या आठवड्यात, लष्करी गुप्तचर संचालनालयाचे मेजर-जनरल चरणजित सिंग देवगन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराचे शिष्टमंडळ म्यानमारमध्ये गेले होते. तेव्हा म्यानमारच्या (Myanmar) लष्कराने लाल गालिचा अंथरून या भारतीय पथकाचे स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये या बातमीला महत्त्व मिळाले नसेल, पण भारतासाठी आणि शेजारील देशांसाठी ही मोठी घटना आहे. एकेकाळी ज्या भारतीयांना म्यानमारमधून बाहेर काढण्यासाठी आंदोलने झाली होती, त्याच म्यानमारमध्ये वाढलेल्या अन्य धर्मियांना रोखण्यासाठी लष्कराकडून हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात येत आहे. अर्थात फक्त म्यानमारमध्येच नव्हे तर नेपाळ आणि श्रीलंका या शेजारी देशांमध्येही हिंदुत्व मॉडेलचा पुरस्कार करण्यात येत आहे. म्यानमारमध्ये बदलत्या या परिस्थितीची नेमकी कारणे काय आहेत, हे समजून घेतले आहे.
म्यानमार (Myanmar) हा देश भारताचा मित्र देश आहे. एकेकाळी या म्यानमारमध्ये भारतीय स्थलांतरितांच्या विरोधात हिंसक आंदोलन झाली होती. मात्र या बौद्ध धर्माचा पुरस्कार करणा-या देशाला भारतीय नागरिकांचा मोठा आधार वाटत आहे. म्यानमारमध्ये लष्कर विरुद्ध बंडखोर गटाचा लढा चालू आहे. या लढ्यात तेथील धार्मिक राष्ट्रवादी नेते भारतातील हिंदुत्वाकडे मॉडेल म्हणून बघत आहेत.
काही दिवसापूर्वी म्यानमारमध्ये भारतीय लष्करी अधिकारी गेले होते, तेव्हा म्यानमारच्या लष्कराने लाल गालिचा अंथरून त्यांचे स्वागत केले. ही गोष्ट एवढीच मर्यादीत नाही. एकेकाळी म्यानमारचे लष्कर चीनला आपला मित्र म्हणून गौरव देत असे. त्यावेळी भारताबरेबर त्यांचे संबंध असे मैत्रीपूर्ण नव्हेत. मात्र आता त्या चीनने म्यानमारमधील बंडखोर गटांना आपला मैत्रीचा हात दिला आहे. परिणामी म्यानमारच्या लष्करानं भारताची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. म्यानमारच्या राजकारणात ही घटना नाट्यपूर्ण घडली असली तरी, त्याचा या देशावर मोठा परिणाम होणार आहे.
=============
हे देखील वाचा : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चेमागचं लव्ह जिहाद कनेक्शन
=============
म्यानमार हा देश कायम वसाहतवादाच्या लढ्याला बळी पडला आहे. ब्रिटीशांनी प्रथम या देशावर सत्ता मिळवली. ही सत्ता उलथावून लावण्यासाठी म्यानमारमध्ये मोठा लढा सुरु झाला. हा लढा थांबावा म्हणून ब्रिटिश वसाहत अधिकाऱ्यांनी भारतातून काही उद्योजकच या देशात आणले गेले. त्यांना म्यानमारमध्ये स्थाईक होण्यासाठी होण्यासाठी ब्रिटीश अधिका-यांनी हरप्रकारे मदत केली. पण या भारतीय नागरिकांना म्यानमारच्या नागरिकांनी मोठा विरोध केला. त्यामुळे त्यातील अर्धेअधिक नागरिक परत आले. जे काही भारतीय नागरिक म्यानमारमध्ये राहिले, त्यांचा एक उच्चभ्रू वर्ग निर्माण झाला. त्यांनी उभारलेल्या उद्योगात भरभराट झाली. म्यानमारमध्ये बौद्ध धर्म अधिक आहे. (Myanmar)
गेल्या काही वर्षात म्यानमारमध्ये (Myanmar) अन्यधर्मियांची संख्या वाढली. यामुळे बौद्ध धर्माच्या अनुयायांना अखेर कडक धोरण अवलंबावे लागले आहे. २०२१ पासून म्यानमारची सत्ता लष्कराकडे आहे. येथे बौद्ध धर्मिय आणि मुस्लिम असे मोठे दोन गट आहेत. या वादात आता म्यानमारमध्ये स्थलांतरीत झालेल्या भारतीयांचे मत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळेच म्यानमारच्या लष्करानं भारतीय सैन्याचे स्वागत करतांना रेड कार्पेट घातला होता. तिथे अनेक वर्ष मैत्री असलेल्या चीनी लष्कराला मात्र दूर लोटले आहे. ही घटना भारतीय राजकारणात महत्त्वाची आहे. भारताचा शब्द हा परदेशात महत्ताचा ठरत आहे. तसेच भारताच्या राजकीय भुमिकेनुसार जागतिक राजकारण फिरते, हे यावरुन सिद्धही होत आहे.
Original content is posted on: https://gajawaja.in/entry-of-the-government-of-india-into-the-polity-of-myanmar-marathi-info/
Comments
Post a Comment