ॲमेझॉन जंगलात सोशल मिडियाचा बोलबाला

 Amazon

जगातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र म्हणून ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलाचा उल्लेख करण्यात येतो. ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेच्या आसपासच्या भागात पसरलेले हे जंगलक्षेत्र ॲमेझॉन (Amazon) नदीच्या भागात आहे. हे जंगल एवढे मोठे आहे की, जवळपास नऊ देशांच्या हद्दीत त्याची व्याप्ती आहे. या जंगलात सर्वात जास्त जैवविविधता आहे. याशिवाय या ॲमेझॉन जंगलात ४०० च्या वर आदिवासी जमाती राहत असल्याची माहिती आहे.

यापैकी काही जनजातींची माहितीही उपलब्ध नाही. या जनजाती आत्तापर्यंत संपूर्णपणे जंगलावर अवलंबून होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून ॲमेझॉन (Amazon) जंगलामध्ये बदल होत आला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. तसेच येथील प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यातच या जंगलाला मोठी आग लागून मोठ्या प्रमाणात वृक्ष हानी झाली. या सर्वांमुळे या जंगलात राहणा-या मनुष्य वसाहतींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.

तर काहींना आधुनिक सुविधा देऊन त्यांना इतर समाजाबरोबर मिसळण्याची संधी देण्यात आली. मात्र या सर्व उपाययोजनांमुळे ॲमेझॉन जंगलातील आदिवासी समाजावर विपरित परिणाम झाल्याची माहिती पुढे आली आहे. ॲमेझॉन (Amazon) जंगलातील या आदिवासी समाजातील तरुणांना सोशल मिडियाची एवढी मोहीनी पडली आहे, की हे तरुण काहीही काम न करता, सतत मोबाईलचा वापर करत आहेत. ॲमेझॉनच्या जंगली जमातीमध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून तरुण पॉर्न आणि रील पाहण्यात व्यस्त आहेत.  यामुळे हा आदिवासी समाज ज्या शेती किंवा संबंधित व्यवसायावर अवलंबून होता, त्यावरही परिणाम झाला आहे.

ॲमेझॉनचे (Amazon) जंगल  म्हणजे, संपन्नता समजली जाते.  या जंगलात अनेक वृक्ष असे आहेत, की त्यांचे वय किती आहे, हे सांगताही येत नाही.  याच जंगलात अनेक दुर्मिळ प्राणीही आढळतात.  तसेच या जंगलात अनेक जनजमातीही हजारो वर्षापासून रहात आहेत.  या जनजमातींनी कधीही बाहेरच्या जगाबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. यापैकी काही जनजमाती या बाहेरुन कोणी मनुष्य आल्यास त्याला मारत असल्याच्याही घटनाही घडल्या आहेत.  मात्र काळानुरुप या जनजमातीही बदलल्या.  त्यांनी बाहेरचा बदल काही प्रमाणात स्विकारायला मदत केली. 

जेथे वीज, पाणी यांची काहीच सोय नव्हती, अशा वस्त्यांमधून लाईटची सोय झाली.  तसेच स्वच्छ पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यात आले.  यासोबतच आरोग्याची समस्याही दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.  ॲमेझॉन जंगलात सर्वाधिक घटना या साप चावल्याच्या होतात. 

अशावेळी संबंधित व्यक्तिला त्वरित औषोधोपचाराची गरज असते.  यामुळेच या वस्तींवर फोनची व्यवस्था करण्यात आली.  आता ॲमेझॉनच्या जंगलातील बहुतांश आदिवासी समुदायांच्या घरात मोबाईल फोन आहे.  तसेच नेटवर्कचे जाळेही या जंगलावर पसरण्यात आले आहे.  मात्र याच नेटवर्कच्या जाळ्यानं आदिवासी संस्कृतीवरच मोठा घाला घातला आहे.  

ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात इंटरनेटचा वापर केल्यामुळे तेथील आदिवासी संस्कृती धोक्यात आली आहे.  हे आदिवासी तरुण आपले काम बाजुला ठेऊन सोशल मिडियावर वेळ घालवत आहेत.  यातही तरुणांना पॉर्न फिल्म पाहण्याचे व्यसन लागल्यानं या आदिवासी समाजातील समाज स्वास्थ धोक्यात आले आहे.  जगाचे फुफ्फुस म्हणून या ॲमेझॉन जंगलांचा उल्लेख करण्यात येतो.  याच फुफ्फुसामध्ये इंटरनेटमुळे प्रदूषण वाढले आहे.  या जंगलातील बहुतांश आदिवासी वस्तींवर अशीच परिस्थिती आहे.  

============

हे देखील वाचा : रिलेशनशिपमधील ‘डेल्युजनशिप’चा अर्थ काय? असा काढा शोधून

============

येथील तरुण सतत मोबाईल वापरत आहेत. यावरील रील आणि पॉर्न फिल्म बघण्यापासून त्यांना कोणी रोखले तर हे तरुण त्यांना विरोध करीत आहेत. मासेमारी, वृक्षतोड, शिकार, मध गोळा करणे, औषधी वनस्पतींची साले गोळा करणे, पर्यटकांना गाईड म्हणून काम करणे अशी कामे येथील आदिवासी आपल्या उपजिविकेसाठी करतात. (Amazon) 

मात्र आता तरुण वर्ग या सोशल मिडियाच्या आहारी गेल्यामुळे वयोवृद्धांना हे काम करावे लागत आहे.  ब्राझीलमध्ये स्टारलिंक सेवा २०२२ मध्ये सुरू झाली. अल्पावधीतच ही सेवा ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचली. मोबाईलच्या या अतिरेकी वापराचे खापर येथील आदिवासींनी गो-या लोकांवर फोडले आहे.  काही वयोवृद्ध आदिवासींच्या मते ॲमेझॉन जंगलातील संस्कृती नष्ट कऱण्यासाठी गो-या  लोकांनी हा मोबाईल तरुणांच्या हातात दिला आहे. 

Original content is posted on: https://gajawaja.in/social-media-dominates-the-amazon-jungle-marathi-info/


Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first