Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !
राजस्थान म्हटलं की समोर येतात, ते तेथील भव्य किल्ले. जयपूर येथील जलमहल , जोधपूर येथील मेहरानगढ , उदयपूरचा भव्य कुंभलगड आणि पुष्कर मधील जगातील एकमेव ब्रह्माजी मंदिर. याच राजस्थानच्या दालबाटीच्या चवीची भूल अवघ्या जगाला आहे. येथील मिर्चीबडा ही सर्वत्र चवीनं खाल्ला जातो. पण याच राजस्थानची आणखी एक ओळख आता होऊ लागली आहे. या राजस्थानमधील अॅपल बोरांनी अवघ्या देशातील बाजारपेठ काबीज केल्याचे दृश्य आहे. राजस्थानच्या वाळवंटी भागात या अॅपल बोरांची शेती मोठ्याप्रमाणत होत आहे. सोबतच येथे लहान बोरांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. (Rajasthan) Top Stories या बोरांच्या वाढत्या उत्पादनानं राजस्थानमध्ये बोरांपासून लोणचे, जॅम, सरबत तयार कऱण्यात येत आहे. अशा छोट्या फॅक्टरी या भागात सुरु झाल्या असून राजस्थानमधील महिलांनी या उद्योगात पुढाकार घेतला आहे. राजस्थानमधील बोरं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किंमतीला विकली जात आहेत. विशेष म्हणजे...