ITR रिफंड उशीरा आला तरी व्याज मिळालं नाही? करदात्यांचे हक्क
ITR : आयकर विवरणपत्र (ITR) भरल्यानंतर अनेक करदाते रिफंडची वाट पाहत असतात. नियमांनुसार रिफंड ठराविक कालावधीत मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक वेळा रिफंड उशीरा येतो आणि त्यावर मिळणारे व्याजही खात्यात जमा झालेले दिसत नाही. अशा वेळी करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो—उशीरा रिफंड आल्यास व्याज मिळायलाच हवे का, की काही अटी लागू होतात? आयकर कायद्यानुसार या संदर्भात स्पष्ट नियम आहेत, असे करतज्ज्ञ सांगतात. (ITR) आयकर कायद्यातील कलम 244A नुसार, करदात्याचा रिफंड उशिरा मिळाल्यास त्यावर व्याज देणे बंधनकारक आहे. साधारणपणे वार्षिक 6 टक्के दराने (म्हणजे दरमहा 0.5 टक्के) व्याज दिले जाते. हे व्याज रिफंडची रक्कम देय झालेल्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रिफंड मिळेपर्यंत मोजले जाते. उदाहरणार्थ, अॅडव्हान्स टॅक्स किंवा TDS जास्त कापला गेला असल्यास आणि रिफंड देण्यात उशीर झाला, तर करदात्याला व्याज मिळण्याचा हक्क असतो. (ITR) मात्र प्रत्येक प्रकरणात व्याज मिळेलच असे नाही. काही परिस्थितींमध्ये आयकर विभाग व्याज देत नाही. उदाहरणार्थ, ITR उशिरा भरल्यास किंवा रिटर्नमध्ये चूक असल्या...