Posts

Showing posts from November, 2024

वाराणसीला वेध देवदिवाळीचे

Image
उत्तरप्रदेशमधील अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज येथे पर्यटकांचा महापूर आलेला आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त या तिनही ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्त दाखल झाले आहेत. त्यातही उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या वर्षी महाकुंभ होत आहे. या महाकुंभ सोहळ्याची तयारीही सुरु झाली असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. आत्ताच अयोध्या मध्ये जसा दिपोत्सव साजरा झाला. तसाच दिपोत्सव वाराणसी येथेही झाला. बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये झालेला हा दिपोत्सव आता पुन्हा करण्यात येणार आहे. त्याला कारण म्हणजे, 15 नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आहे. या देवदिवाळीसाठी वाराणसीमध्ये दिपोत्सव करण्यात येणार आहे. काशीमध्ये अगदी पावलापावलावर मंदिरे आहेत. या सर्व मंदिरात रोषणाई करण्यात येणार असून बाबा विश्वनाथांच्या मंदिरात विशेष लाईट शो चेही आयोजन करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अहोरात्र भक्तांची ये जा चालू असते. याच भक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आता लाईट शो ही करण्यात येणार आहे. (Dev Diwali 2024) Top stories वाराणसी हे गंगा नदीच्या काठाव

हिवाळ्यात ‘या’ सोप्या टिप्स वापरून घ्या ओठांची काळजी

Image
हिवाळा सुरु झाला की, अनेकांना आनंद होतो. कारण हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला समजला जातो. मात्र याउलट हाच हिवाळा आपल्या त्वचेच्या दृष्टीने खूपच हार्ड ठरतो. त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे अनेक त्वचा रोग देखील सुरु होतात. आपण किती देखील व्हॅसलिन लावले, बॉडी लोशन लावले तरी आपल्याला त्याचा जास्त फायदा होत नाही. यासाठी आपण इतरही अनेक उपाय करू शकतो. काही खाण्यापिण्यामध्ये बदल करून किंवा घरगुती काही छोटे उपाय करून हे नक्कीच बरे करू हुकतो. Top stories याचा जास्त परिणाम दिसतो तो ओठांवर. हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच बऱ्याचदा या ऋतूत लोक ओठ फाटण्याच्या समस्येने त्रस्त असतात. आपले ओठ सर्वात आधी लक्ष वेधून घेतात. त्यामुळे जेव्हा आपले ओठ खराब दिसू लागतात, त्याला तडे जातात, ते कोरडे होतात, त्याची स्किन निघते कधी कधी तर ओठांमधून रक्त देखील येते. यासाठी आपण बरेच उपाय केले तरी पाहिजे तितका फायदा आपल्याला होत नाही. मात्र यासाठीच आता आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ होतील. ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्य

तुळशी विवाहाचे महत्व आणि कथा

Image
  आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास असलेल्या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य समजले जाते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्याचा काळ म्हणजेच चातुर्मास समजला जातो. दिवाळी नंतर कार्तिक महिन्यात येणारी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि शुभ कार्य करण्यास सुरुवात होते. मात्र त्याआधी या एकादशीच्या दिवशी आपल्याकडे तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. Top stories कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्नसराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते या दिवशी उपवास करुन भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दु:ख देखील दूर होते. कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात एका तुळशी विवाहचा कार्यक्रम केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे भगवान विष्णूसोबत लग्न लावले जाते. या तुळशी विवाहाची देखील एक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया त्या कथेबद्दल. तुळशी विवाह कथा पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक पुढे जा

इस्कॉनच्या भाविकांची बांगलादेशमध्ये कत्तल !

Image
  ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारताचा आश्रय घेतला. त्यानंतरही बांगलादेशमध्ये उसळलेले आंदोलन थंड झालेले नाही. सध्या बांगलादेशाची कमान मोहम्मद युनूस यांच्याकडे आहे. मात्र त्यांनाही बांगलादेशमधील परिस्थिती सामान्य करण्यात यश आले नाही. या आंदोलनात सर्वाधिक नुकसान झाले आहे ते बांगलादेशी हिंदू कुटुंबांचे. अनेक हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत. उद्योग नष्ट करण्यात आले. मुख्यतः हिंदूंची मंदिरे जाळण्यात आली, त्या मंदिरातून उघडपणे लूट करण्यात आली. मात्र या सर्वांवर अंकूश ठेवण्यात मोहम्मद युनूस अपयशी ठरले. उलट त्यांच्याच आशीर्वादानं हे अत्याचार चालत असल्याची परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे. कारण बांगलादेशमध्ये आता इस्कॉन मंदिराना लक्ष करण्यात येत आहे. इस्कॉन मंदिरात जाणा-या भाविकांच्या गळ्यात तुळशीची माळ असते, तसेच त्यांच्या कपाळवर टिळा असतो. असे भाविक दिसले की त्यांना ठार करा, असा इशाराच आता बंगालदेशमधील कट्टरपंथीय देत आहेत. नवरात्रौत्सवात इस्कॉनच्या भाविकांची बांगलादेशमध्ये कत्तलमध्ये देवींच्या मंडपांचेही नुकसान करण्य

जाणून घ्या तुळशी माळ घालण्याचे फायदे आणि नियम

Image
  आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे . आपली हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे . तुळशीला धार्मिक , पौराणिक आणि वैज्ञानिक असे सर्वच बाजूने मोठे महत्व आहे . आपल्या देशात तर प्रत्येक घरात तुळशीचे रोप , झाड असते म्हणजे असतेच . रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे ही आपल्याकडे परंपराच आहे . प्रत्येक घरातील स्त्रिया ही परंपरा पळतातच . Top Stories . यासोबतच तुळशीची पाने खाणे , तुळशीची माळ घालणे आदी अनेक गोष्टी भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत . तुळशीची माळ देखील प्रत्येकाच्याच घरात असते . या माळेला तुळशीचे मणी किंवा तुळशीची जपमाळ या नावाने देखील ओळखले जाते . या माळेचे देखील मोठे महत्व आहे आणि तिचे अनेक फायदे देखील आहेत . ही तुळशी माळ तुळशीच्या रोपापासून बनवली जाते . आज तुळशी विवाह साजरा होत आहे . त्यानिमित्ताने जाणून घेऊया या तुळशी माळेच्या विविध फायद्यांबद्दल . तुळशीची माळ घातल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे . य