HAROP Drone : पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करणाऱ्या ‘हार्पी ड्रोन’ची वैशिष्ट्ये
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान या दोन देशांवर आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे. या मोहिमेमुळे भारताने पाकिस्तनला चांगलेच हादरवले. यामुळेच पाकिस्तानने कोणताही विचार न करता भारताच्या बॉर्डरवर असलेल्या शहरांमध्ये बेछूट गोळीबार केला. मात्र भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने भारतावर ५०० ड्रोनने हमला केला, मात्र भारताने याला हाणून पाडले आहे. (HAROP Drone) Top Marathi Headlines चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचा हा प्रयत्न मोडला आहे. भारताने गुरुवारी पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. हा भारतासाठी मोठा विजय ठरला. यामुळे पाकिस्तानला मोठा हादरा बसला. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट करण्यासाठी भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर केला आहे. हार्पी ड्रोनमुळे भारताला मिळालेले हे मोठे यश पाहून सगळ्यांनाच मोठा आनंद झाला आहे. (Marathi Latest News) भारताला पाक...