HAROP Drone : पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करणाऱ्या ‘हार्पी ड्रोन’ची वैशिष्ट्ये

 

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान या दोन देशांवर आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे. या मोहिमेमुळे भारताने पाकिस्तनला चांगलेच हादरवले. यामुळेच पाकिस्तानने कोणताही विचार न करता भारताच्या बॉर्डरवर असलेल्या शहरांमध्ये बेछूट गोळीबार केला. मात्र भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने भारतावर ५०० ड्रोनने हमला केला, मात्र भारताने याला हाणून पाडले आहे. (HAROP Drone) Top Marathi Headlines

चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचा हा प्रयत्न मोडला आहे. भारताने गुरुवारी पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. हा भारतासाठी मोठा विजय ठरला. यामुळे पाकिस्तानला मोठा हादरा बसला. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट करण्यासाठी भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर केला आहे. हार्पी ड्रोनमुळे भारताला मिळालेले हे मोठे यश पाहून सगळ्यांनाच मोठा आनंद झाला आहे. (Marathi Latest News)

भारताला पाकिस्तानला हरवण्यासाठी हार्पी ड्रोनने हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करून मोठी मदत केली आहे. मात्र कोणत्याही देशाची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करणे म्हणजे त्या देशाच्या एअर फोर्सलाचा मोठे ठिगळं पडण्यासारखे असते. हे मोठे यश मिळवून देण्यामध्ये मुख्य भूमिका बजवणाऱ्या हार्पी ड्रोनबद्दल आपण खास माहिती जाणून घेऊया. (Marathi Top NEws)

हार्पी ड्रोन हे पाळत ठेवण्यासोबतच एक धोकादायक क्षेपणास्त्र म्हणून देखील काम करते. हा ड्रोन लक्ष्यावर फिरत राहतो आणि सापडताच थेट हल्ला करतो. हा हार्पी ड्रोन अतिशय शक्तिशाली आणि विनाशकारी आहे. जाणून घेऊया या ड्रोनची खास वैशिष्ट्ये.

भारताकडे असलेला हार्पी ड्रोन हा इस्त्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केला आहे. हा द्रोण पूर्णपणे अनमॅन्ड एरिअल व्हिकल आहे. हार्पी ड्रोनची तब्बल ९ तास उड्डाण करण्याची त्याची क्षमता ऑन, या ड्रोनची ऑपरेशनल रेंज २०० किलोमीटर आहे. त्यामुळे शत्रूला संपवण्यासाठी या ड्रोनचा उपयोग अतिशय फायदेशीर ठरतो. हार्पी ड्रोन आपल्या टार्गेटला स्वतः शोधतो, ओळखतो आणि त्याचे ट्रॅकींग करण्याचे काम ऑटोमॅटीक करतो. या हार्पी ड्रोनचा डेटा दोन पद्धतीने लिंक करता येतो, त्यामुळे त्याचे ऑपरेशन सांभाळणाऱ्या व्यक्तीला रिअल टाईममध्ये राहून योग्य निर्णय घेता येतो. जर युद्धाची परिस्थिती बदलल्यावर ड्रोन ऑपरेटर व्यक्ती हल्ला रोखू शकते आणि या ड्रोनला माघारी देखील बोलवू शकते. या ड्रोनची भारत आणि अझरबैजान या देशांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. (Marathi Trending News) Todays Marathi News

=======

हे देखील वाचा : Airport : देशातील ‘ही’ विमानतळं बंद, विमान प्रवास करण्याच्या नियमांमध्ये बदल

Air Defence : भारताने नष्ट केली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम, जाणून घ्या या प्रणालीबद्दल

War : पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद

=======

हार्पी ड्रोनमध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल, इंफ्रारेड आणि फॉरवर्ड लुकिंग इंफ्रारेड सेन्सर लावले आहे. शिवाय या ड्रोनमध्ये कलर सीसीडी कॅमरा आणि एंटी रडार होमिंग सुद्धा आहे. त्यामुळे त्याला टार्गेट शोधणे आणि कन्फर्मेशन मिळवणे सोपे होते. २३ किलोपर्यंतची स्फोटके हा ड्रोन नेऊ शकतो. त्याला एका कॅनिस्टरवरुन लॉन्च केले जाते. त्यामुळे ते तैनात करणे सोपे होते. विशेष म्हणजे त्यावर लक्ष ठेवणे सोपे आहे. हे ड्रोन टार्गेट अटॅक करण्यासाठी डिझाइन केले गेले असून, त्यात ते माहिर आहेत. हे ड्रोन शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यास सक्षम आहेत. शिवाय या ड्रोनमध्ये छोट्या क्षमतेचे मिसाइल देखील असते.(Top News)

Original content is posted on https://gajawaja.in/india-used-harop-drones-to-attack-on-pakistan-know-harop-drones-features-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !