First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी
इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली. चाळीस दिवसांनंतर या युद्धातून काहीही साध्य न करता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंधरा दिवसांचा युद्धविराम जाहीर केला. वास्तविक, यामागे ट्रम्प यांच्याभोवती उठलेले वादळ आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेच्या तिजोरीवर दरदिवसाला काही अब्ज डॉलर्सचा बोजा पडत होता. यामुळे तेथील जनजीवनावरही त्याचा परिणाम होऊ लागला होता. परिणामी अमेरिकेतही ट्रम्पविरोधी वातावरण होऊ लागले आहे. मात्र या सर्वाकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी कानाडोळा करत आणखी एक कारनामा केला आहे की, त्यातून जनतेचा त्यांच्यावरील रोष वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्नीसाठी, मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी, ७० दशलक्ष डॉलर्सच्या जेटच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘बिग ब्युटीफुल’ नावाचे बोईंग ७३७ मॅक्स ८ जेट अमेरिकेच्या फर्स्ट लेडीच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. एकीकडे इराण युद्धामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असताना मेलानिया यांच्या ऐषोआरामासाठी एवढे महागडे हवाई जहाज कशाला हवे, हा प्रश्न आता विचारला जात आहे. अ...