New Year : जगातील ‘हे’ देश साजरे करत नाही इंग्रजी नवीन वर्ष

 

आज संपूर्ण जगामध्ये नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. २०२५ या वर्षाला निरोप देऊन सर्वच लोकं २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यास अतिशय उत्सुक आहे. एव्हाना तर जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये नवीन वर्ष सुरु देखील झाले असेल. भारतात अजून २०२६ सुरु व्हायला काही तास आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने या महिन्याचा शेवट म्हणजे वर्षाचा शेवट समजला असतो. संपूर्ण जगामध्ये आज २०२५ वर्षाला निरोप दिला जात असून, २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. मात्र जगातील काही मोजके देश मात्र आज कोणतेही नवीन वर्ष साजरे करणार नाही. जगभरातील बहुतेक देश ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्षाचे स्वागत करत असले तरी असेही काही देश आहे, जे हे कॅलेंडर वापरत नाही. त्यामुळे या देशांमध्ये आज कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही. असे देश कोणते चला जाणून घेऊया. (Happy New Year 2026)

नेपाळ
नेपाळमध्ये बिक्रम संवत मध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ते एप्रिलच्या मध्यात साजरे केले जाते. कारण नेपाळ विक्रम संवत कॅलेंडरचे पालन करतो, जे ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 57 वर्षे पुढे आहे. नेपाळी नववर्ष सांस्कृतिक परेड, मेजवानी आणि समारंभांसह साजरे केले जाते. भक्तपूर आणि काठमांडूमध्ये उत्सव सर्वात प्रमुख असतात. (Marathi)

इथिओपिया
इथिओपियामध्ये देखील आज नवीन वर्ष साजरे होत नाहीये. या देशातील नवीन वर्षाला एन्कुटाटाश म्हणतात. एन्कुटाटाश चा दिवस ११ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. लीप वर्षात पारंपारिकपणे नववर्ष १२ सप्टेंबर रोजी साजरे केले जाते. इथिओपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ७ ते ८ महिने मागे असल्याचे सांगितले जाते, म्हणूनच या देशाचे नवीन वर्ष सप्टेंबरमध्ये येते. इथिओपियन नवीन वर्षाला फुलांचा उत्सव म्हणून देखील ओळखले जाते. (Marathi News)

थायलंड
थायलंडमध्ये नवीन वर्षाला सोंगक्रान म्हणतात. याला थाई नवीन वर्ष असेही म्हणतात. नवीन वर्ष सौर कॅलेंडरनुसार ठरवले जाते आणि दरवर्षी १३ ते १५ एप्रिल दरम्यान साजरे केले जाते. या खास प्रसंगी लोक एकमेकांवर पाणी टाकतात. मंदिरांना भेट देतात आणि बुद्ध मूर्ती स्वच्छ करतात. कुटुंबे एकत्र जमतात आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतात. (Todays Marathi HEadline)

New Year

चीन
चिनी नववर्ष २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान साजरे केले जाते. चीनच्या नवीन वर्षाला लूनर न्यू ईअर म्हटले जाते. याला वसंत महोत्सव असेही म्हणतात. चिनी नववर्ष त्यांच्या मून दिनदर्शिकेनुसार ठरवले जाते. नवीन वर्षाच्या काळात चीनमध्ये सर्वत्र लाल रंगाची सजावट केली जाते. चीनमध्ये लाल रंगाला खूप शुभ मानले जाते. म्हणूनच या काळात इथे लाल रंगाला अनुसरून घरं, दुकानं, मॉल्स, पार्क, सार्वजनिक ठिकाणांना सजवतात. चीनमधील घरांवर या काळात लाल कागदावर सोनेरी अक्षरात नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहिल्या जातात. (Latest Marathi Headline)

व्हिएतनाम
टेट हा व्हिएतनाममधील सर्वात महत्वाचा सण आहे, जो चंद्र नववर्षासोबत साजरा केला जातो. हा सहसा जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या मध्यात येतो. व्हिएतनामच्या नववर्षाची तारीख देखील दरवर्षी तारीख बदलत असते. या देशात नवीन वर्षाच्या काळात पूर्वजांना श्रद्धांजली वाहणे, बान चुंग सारखे विशेष पदार्थ शिजवणे आणि घरांची स्वच्छता केली जाते. (Top Marathi News)

श्रीलंका
श्रीलंका देशात १३ आणि १४ एप्रिल रोजी सिंहली आणि तमिळ नववर्ष म्हणून साजरे केले जाते. हे नवीन वर्ष सूर्याचे मीन राशीतून मेष राशीत संक्रमण दर्शवते, जे कापणीच्या हंगामात संक्रमण दर्शवते. उत्सवांमध्ये पारंपारिक खेळ, गोड पदार्थ आणि समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक असलेल्या सांस्कृतिक विधींचा समावेश असतो. (Top Trending Headline)

=========

New Year : सर्वात आधी कोणता देश करतो नवीन वर्षाचे स्वागत?

New Year : कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कधी होते?

=========

इराण
इराणमध्ये नवीन वर्षाला नौरोज म्हणतात. दरवर्षी २० किंवा २१ मार्च रोजी तेथील लोकं नववर्ष साजरे करतात. पर्शियन नवीन वर्षाचे प्रतीक असलेले नौरोज हे ३००० वर्षांहून अधिक जुने असल्याचा दावा केला जातो आणि वसंत ऋतूतील विषुवशी जुळते. नौरोज केवळ इराणमध्येच नव्हे तर अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कुर्दिस्तान, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि पर्शियन सांस्कृतिक प्रभाव असलेल्या अनेक प्रदेशांमध्येही साजरा केला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/these-countries-do-not-celebrate-english-new-year/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?