Alcohol : सावधान! दारु पिण्याची सवय पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक
आज ३१ डिसेंबरच दिवस अर्थात २०२५ वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवशी संपूर्ण जगामध्ये थर्टी फर्स्टचा जश्न सुरु झाला असेल. २०२६ चे दणक्यात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. आज सर्वच लोकं बेधुंद होऊन नवीन वर्षांचे स्वागत करतील. नवीन वर्षाची पार्टी म्हटल्यावर दारू सेवन आणि नॉन व्हेज आलेच. आता तर महिला देखील अतिशय बिधास्त होऊन दारूचे सेवन करतात. आधी देखील महिला दारू प्यायच्या, मात्र आधी त्या बंद दरवाजाच्या मागे असायच्या, आता तसे नाही आता महिला सर्वांसमोर दारूचे सेवन करताना दिसतात. मात्र दारूचे सेवन महिलांसाठी योग्य आहे की अयोग्य? (Alcohol) Marathi News
अल्कोहोलचे सेवन पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेगळ्या प्रकारे प्रभावित करते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना मद्यपी यकृतचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अल्कोहोलचे कमी सेवन करूनही त्यांना अल्कोहोलिक यकृत रोगाचा त्रास होऊ शकतो. जर एखादी महिला आठवड्यातून १४ पेक्षा जास्त वेळेला दारू पीत असेल तर तिला अल्कोहोलिक यकृत रोग होण्याची शक्यता अधिक असते. या महिलांना लठ्ठपणा, आहारात जास्त चरबी आणि दररोज किंवा जास्त प्रमाणात मद्यपान हे देखील यकृत खराब होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्कोहोल घेतल्याने स्त्री आणि पुरुष दोघांनाही हृदयविकाराची समस्या होऊ शकते. परंतु केवळ महिलांचा विचार केला तर अति मद्यपानामुळे त्यांना खूप त्रास होऊ शकतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संशोधनातून असे समोर आले आहे की अति मद्यपान केल्याने महिलांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. (Women’s Health)
महिलांनी दारूचे सेवन केल्याने कोणते त्रास होतात?
– दारू प्यायल्याने महिलांमध्ये लिव्हर सिरोसिसची समस्या अधिक होऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत महिला याने जास्त ग्रस्त होतात. दारुमुळे महिलांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. (Todays Marathi Headline)
– बदलत्या काळानुसार महिलांनी सर्वाधिक दारू पिण्यास सुरुवात केली आहे. दारू पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, जेव्हा महिला आठवड्यातून किमान तीन ते सहा वेळेस अल्कोहोलिक ड्रिंक घेतात, तेव्हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त वाढू शकतो. (Marathi News)
– महिलांनी मद्यपान केल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. महिलांनी दारू प्यायल्यास तुमच्या लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. म्हणून, नेहमी मर्यादित प्रमाणातच अल्कोहोलचे सेवन करा. तज्ज्ञ सांगतात की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दारूचे दुष्परिणाम लवकर दिसतात. कमी प्रमाणात दारू घेतली तरी लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते. (Top Marathi Headline)
– मद्यपान करणाऱ्या महिलांना मधुमेहाचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर दारू तुमच्यासाठी विषासारखी आहे. अशा स्थितीत दारू पिणाऱ्या महिलांना मधुमेह आणि मानसिक तणाव दोन्ही असू शकतात.
– गर्भधारणेदरम्यान महिलांनी अल्कोहोल प्यायल्याने बाळाला फेटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका असतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे गर्भपात, स्टिल बॉर्न बेबी आणि बाळाला अनेक जन्मजात रोगांचा धोका वाढतो. दारू पिणाऱ्या महिलांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या वाढतात. मद्यपानामुळे वंध्यत्व येते. मद्यपानामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. बीज अंडे फुटण्यातही अडथळा निर्माण होतो, गर्भधारणा रुजण्यात अडथळा होतो. (Latest Marathi Headline )
========
Party : जाणून घ्या पार्टीमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या कॉकटेल आणि मॉकटेलमधील नेमका फरक
========
– मासिक पाळीच्या दरम्यान अल्कोहोल प्यायल्याने रक्त पातळ होणे किंवा अतिरिक्त रक्तस्त्रावाची समस्या होऊ शकते. एका मर्यादेत दारू पिणे वाईट नाही, पण जर तुम्ही जास्त प्रमाणात दारू पित असाल तर तुम्हाला अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Top Trending News)
– पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी दारू अधिक नुकसानदायक ठरते. महिलांच्या शरीरातील जैविक प्रक्रिया दारूचं विघटन कमी प्रमाणात करू शकतात, त्यामुळे लिव्हरवर दारूचा परिणाम वेगाने होतो. परिणामी लिव्हर डॅमेज होण्याचा धोका वाढतो. (Social News) Top stories
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/alcohol-is-more-dangerous-for-women-than-men/
Comments
Post a Comment