China : चिनी वर…पाकिस्तानी वधू !

 

वेगानं वाढणा-या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनमध्ये १९८० मध्ये एक मूल धोरण लागू करण्यात आले. हे धोरण २०१५ पर्यंत लागू राहिले आणि नंतर हळूहळू ते रद्द करण्यात आले. या ३५ वर्षाच्या काळात चीनमधील लोकसंख्या नियंत्रणात राहिली. मात्र या एक मूल धोरणाचा परिणाम चीनमध्ये २०१५ नंतर जाणवू लागला. त्यामुळे २०१६ साली चीनमध्ये दांम्पत्यांना दोन मुले करण्याचा आग्रह सुरु झाला. २०२१ पासून तर कमीत कमी तीन मुले हे धोरण चीनमध्ये आखण्यात आले. फारकाय चीनमध्ये मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारीही सरकार घेत आहे. असे असले तरी येथील लोकसंख्येमध्ये होत असलेली घसरण थांबवता येत नाही. कारण एक मूल धोरणाचा विपरीत परिणाम चीनमध्ये झाला आहे. लोकसंख्येमध्ये कमालीचे असंतुलन झाल्यामुळे स्त्री-पुरुष यांची लोकसंख्या विषम झाली आहे. परिणामी आता चीनमध्ये तरुणांना लग्न करण्यासाठी मुलगीही मिळत नाही. (China) International News

अशा तरुणांना आता लग्न करण्यासाठी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी मुली मिळवून देण्याचे एक मोठे रॅकेटच चीनमध्ये चालवण्यात येत आहे. चिनी वर आणि पाकिस्तानी वधू असे विवाह चीनमध्ये आता सर्वमान्य झाले आहेत. मात्र या सर्वात लैंगिक गुलामगिरीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण लग्न करुन ज्या तरुणी चीनमध्ये येत आहेत, त्यांना चिनी समाज स्विकारत नसल्याचे उघड होत आहे. या विवाहितेला मूल झाल्यावर घरातून बाहेर काढल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. अशा पाकिस्तानी आणि बांगलादेशी तरुणी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसायात ओढल्या गेल्याचा भयाण वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे चीनमधील समाजसेवी संस्था पुढे आल्या असून वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या पाकिस्तानी तरुणींची सुटका करण्या येत आहे. (International News)

अलिकडच्या काळात जागतिक आर्थिक आणि लष्करी शक्ती म्हणून चीन उदयास येऊ पाहत आहे. मात्र या देशात सामाजिक प्रश्न गांर्भिर्यानं पुढे आले आहेत. १९८० मध्ये चीनध्ये जे एक मूल धोरण राबवले, त्याचे आता गंभीर परिणाम तेथील समाजजीवनावर होत आहेत. चीनमध्ये एक मूल धोरणामुळे लोकसंख्येचा असमतोल तयार झाला आहे. त्यातून विवाह इच्छूक तरुणांना मुलीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यातच चीनमध्ये महागाई आणि कार्यालयीन कामाचे वाढते तास यामुळे तरुण पिढी भरडली गेली आहे. ही तरुण पिढी लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, चीनची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. तसेच जी लोकसंख्या आहे, ती वृद्धापकाळाकडे सरकत आहे. (China)

यासाठी चीन सरकार तरुणांना लग्न करुन मुलं जन्माला घालण्याचे आवाहन करत आहे. आता या तरुणांना विवाह करण्यासाठी तरुणीच मिळत नसल्यामुळे या तरुणांना मदत करण्यानिमित्त काही टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या चक्क पाकिस्तान, बांगलादेशमधून गरीब कुटुंबातील मुलींना पैसे देऊन विकत घेतात आणि त्यांची लग्न चीनमधील तरुणांबरोबर लावून देत आहेत. चीनमध्ये तरुणींच्या कमतरतेमुळे हा सीमापार विवाहांचा ट्रेंड वाढला आहे. चिनी पुरुष पाकिस्तान आणि बांगलादेशातील गरीब महिलांना चांगल्या जीवनाचे आश्वासन देत लग्नाच्या जाळ्यात ओढत आहेत. मात्र लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृतींमुळे या लग्नात अडथळे निर्माण होत आहेत. पाकिस्तानी मुलींनी चिनी पुरुषांशी लग्न केल्याचा मुद्दा पहिल्यांदा २०१९ मध्ये उघडकीस आला. पाकिस्तानच्या तपास संस्थेने एक आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी तरुण पाकिस्तानी महिलांची चीनमध्ये तस्करी करत होती. येथे या मुलींचे लग्न लावून देण्यात येत असे, मात्र लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात या मुली वेश्याव्यवसायात ओढल्या गेल्याचे आढळून आले. (International News)

पाकिस्तान शिवाय, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, म्यानमार, बांगलादेश आणि कंबोडियामधूनही तरुणींना चीनमध्य़े नेले जाते. या मुलींचे सुरुवातीचे दिवस चांगले असतात, मात्र त्यांना मुलं झाल्यावर त्यांना त्यांचे चिनी कुटुंब घरातून बाहेर काढते, अशावेळी या तरुणी वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकल्या जातात. आता हे प्रकार उघडकीस येऊ लागल्यावर ढाका येथील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना स्थानिक महिलांशी लग्न करणे टाळण्याचा इशारा दिला आहे. असाच प्रकार पाकिस्तानबाबत होत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या चीनच्या सहकार्याने काही विकासकामे सुरु आहेत. यावर अनेक चिनी कामगार काम करत आहेत, वेगवेगळ्या आर्थिक स्तरावरील या कामगारांचे आणि पाकिस्तानी तरुणींचे लग्न लावून देण्यासाठी काही स्थानिक टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. (China)

हे देखील वाचा : Venezuela : अमेरिका व्हेनेझुएला मधला तणाव युद्धाच्या वाटेवर…

========

ब-याचवेळा वीज प्रकल्पावर काम करणारे अभियंते असल्याचे भासवून लग्न करतात आणि पाकिस्तानी महिलांना चीनमध्ये पाठवतात. या महिलांच्या बदल्यात या एजंटना हजार ते लाखापर्यंत पैसे मिळत आहेत. २०१९ मध्ये अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस आली. त्यात चिनी तरुण आणि पाकिस्तानी एजंट यांना अटक झाली. त्यानंतर चिनी दुतावासानं आपल्या कर्मचा-यांना अशा कुठल्याही टोळीच्या जाळ्यात सापडू नका, म्हणून ताकीद दिली होती, असे असले तरी चिनी तरुणांकडून लग्न करण्याच्या बदल्यात मोठी रक्कम मिळत असल्यानं अनेक पाकिस्तानी कुटुंब आपल्या मुलींची लग्न स्वतःहून चीनमध्ये लावून देत आहेत. (International News) Latest International News

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/chinese-groom-and-pakistani-bride/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी