Health : तुम्ही पण जेवल्यानंतर लगेचच झोपता….? मग आजच ही सवय बदला

 

आजच्या काळात आपण पाहिले तर आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा मोठा पगडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपण आपली संस्कृती आणि जुने विचार मागे सोडून आधुनिक विचार आत्मसाद करत आहोत. मात्र हे करताना त्याचे दुष्परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागणार आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. पूर्वी किंवा आजही घरातील वयस्कर मंडळी रात्री लवकर जेवून शतपावली करतात आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठतात. पण आजकाल याच्या अगदी उलट असते. रात्री उशिरापर्यंत जागणे उशिरा जेवणे, पहाटे उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे. याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होत आहे. (Health) Marathi News

आजकाल तर सगळे रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. खाण्याच्या या चुकीच्या पद्धतींमुळे खूपच कमी वयात मोठ्या व्याधी मागे लागताना देखील दिसत आहे. जेवल्यानंतर लगेच झोपणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चुकीचे आणि गंभीर आजारांना आमंत्रण देणारे आहे. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. यामुळे अनेक आजारांची शक्यता वाढते.
अनेक लोकं जेवणानंतर बसून राहणं किंवा झोपणं पसंत करतात. खाण्यानंतर लगेच झोपणे हे शरीराच्या पचनक्रियेला आणि आरोग्याला प्रभावित करते. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने नक्की कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

आणखी शोधा

आरोग्य

पचनक्रियेवर ताण
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रियेवर ताण येऊ शकतो. पचनक्रिया ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यात अन्नाचे विभाजन, विघटन, आणि पोषणाचे शोषण या गोष्टींचा समावेश होतो. खाण्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सोपी होते. परंतु, जेवल्या जेवल्या लगेच झोपल्यावर रक्तप्रवाह कमी होतो आणि पचनक्रियेच्या गतिमानतेवर परिणाम होतो. यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही. नीट पचन न झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. (Latest Marathi HEadline)

ऍसिडिटीचा त्रास होणे
खाण्यानंतर लगेच झोपल्यास ॲसिडिटी आणि छाती जळजळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पचनक्रियेतील ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे, अन्ननलिकेत ऍसिडची मात्रा वाढते. यामुळे ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळणे, आणि घशात जळजळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ऍसिडिटीमुळे झोपेच्या वेळी अपचन आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. या समस्या टाळण्यासाठी, खाण्यानंतर किमान एक तास बसून राहणे किंवा चालणे आवश्यक आहे. यामुळे पचनक्रियेतील ऍसिडचे प्रमाण नियंत्रित राहते आणि ऍसिडिटीची समस्या कमी होते. (Top Marathi News)

आणखी शोधा

आरोग्य

Health

वजन वाढणे

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने वजनवाढ होण्याची शक्यता अधिक असते. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरातील कॅलरी जलद बर्न होत नाही. त्यामुळे, न वापरलेल्या कॅलरीज चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागतात. शरीराच्या चयापचयाच्या क्रियेतही याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त वजनाची समस्या निर्माण होते. (Top Marathi Headline)

डायबिटिस आणि हृदयविकाराचा धोका
खाण्यानंतर लगेच झोपल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे डायबिटिसचा धोका वाढतो. विशेषतः गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट समृद्ध अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यास, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. यामुळे इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि हळूहळू डायबेटिसचा धोका वाढू शकतो. तसंच, वजनवाढीमुळे हृदयविकारांचा धोका देखील वाढतो. हृदयविकारांपासून बचावासाठी, खाण्यानंतर काही काळ विश्रांती घेणे आणि सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे. (Latest Marathi News)

आणखी शोधा

आरोग्य

झोपेची गुणवत्ता कमी होणे
खाण्यानंतर लगेच झोपल्यास झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. पचनक्रियेच्या वेळी शरीरातील उष्मांक अधिक प्रमाणात वापरला जातो, ज्यामुळे शरीराचा आरामदायीपणा कमी होतो. त्यामुळे झोपेत सतत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. नियमितपणे अशी झोप घेतल्यास, झोपेची सायकल बिघडू शकते. (Trending Headline)

आणखी शोधा

आरोग्य

जेवल्यानंतर चालण्याचे फायदे
जेवण आणि झोपेच्या वेळेमध्ये किमान तीन तासांचं अंतर असणे गरजेचे आहे. या तीन तासांच्या अंतरामध्ये पोटातून अन्न लहान आतड्यांकडे सरकतं आणि यामुळे पचनक्रिया सुरूळीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर रात्री छातीत जळजळ होणे आणि निद्रानाशासारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत. रात्री जेवल्यावर चालण्याची सवय पचन प्रक्रियेला वेग देते आणि पचनतंत्र सक्रिय करते. त्यामुळे अन्न पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. जेवणानंतर नियमितपणे चालल्याने पोट फुगणे, एसिडिटी आणि छातीतील जळजळ कमी होते. (Top Stories)

आणखी शोधा

आरोग्य

========

Health : तुमची देखील झोपेत लाळ गळते का? जाणून घ्या यामागचे कारण

आणखी शोधा

आरोग्य

========

यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो, कारण हे आतड्यांच्या कार्यक्षमतेला उत्तेजन देते आणि मल त्याग करणे सोपे करते. यासोबतच जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणाच्या अगोदर किंवा जेवण केल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने पाणी प्यावे. तसेच जेवण केल्यानंतर अर्ध्या किंवा एका तासाने शतपावली करावी. जेवणानंतर वज्रासन करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हे आसन पायांच्या स्नायूंना आराम देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या सवयी जर तुम्ही अंगिकारल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. (Social News

आणखी शोधा

आरोग्य

(टीप: या लेखात देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

आणखी शोधा

आरोग्य

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/sleeping-immediately-after-eating-effect-on-digestion-and-gut-health/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी