Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

 

प्रत्येक व्यक्तीला जीवनात आर्थिक भरभराट हवीच असते. त्यासाठीच तो कायम मेहनत घेतो आणि प्रयत्नही करत असतो. मात्र मनुष्याच्या प्रयत्न आणि मेहनतीसोबतच दैवी आशीर्वाद देखील फार आवश्यक असतो. त्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. आता आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना हिंदू धर्मामध्ये धनाची देवता म्हणून ओळखले जाते. यांची विधिवत पूजा केल्यास नक्कीच त्यांची कृपा होते आणि आर्थिक सुबत्ता लाभते. मात्र जर गजलक्ष्मीची पूजा केली तर त्याचा अधिक फायदा होतो. आजवर आपण कमळात बसलेली, उभी असलेली लक्ष्मी, खाली बसलेली लक्ष्मी अशा विविध लक्ष्मीच्या रूपांची पूजा करत असतो. मात्र यांसोबतच गजलक्ष्मीची पूजा करणे देखील लाभदायक आहे. (Gajlakshmi) Marathi News

गजलक्ष्मी म्हणजे हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी. गजलक्ष्मी ही ऐरावत हत्तीवर स्वार असते तर हत्ती मुखात कलश घेऊन उभा असतो. देवीच्या या स्वरूपातील लक्ष्मीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते. तुम्ही घरात सुख-शांती नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशिर्वाद सैदव राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो ठेवून त्याची पूजा करू शकता. ऐरावत हत्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते. हत्ती सोंडेत फुलदाणी घेऊन असेल तर त्याहूनही अधिक शुभफळ देत असल्याचे चित्र आहे. गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घराच्या किंवा मंदिराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात उजव्या हाताला ठेवावी. देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशेला ठेवणे देखील शुभ मानले जाते. (Marathi News)

Gajalakshmi

वास्तुनुसार गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कुटुंबाची प्रगती होते असे मानले जाते. हा फोटो घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते, असे म्हटले जाते. घरात हत्तीवर बसलेल्या लक्ष्मीच्या चित्राने किंवा मूर्तीने समृद्धी, सुख, समृद्धी, शांती, भव्यता, ऐश्वर्य, प्रगती, सिद्धी, सुख, ऐश्वर्य इत्यादींचा मार्ग सहज उघडतो. हत्तीवर स्वार होणार्‍या माता लक्ष्मीला गजलक्ष्मी म्हणतात आणि अष्टमीला विशेष उपवास, पूजा-अर्चा केली जाते. (Top Trending News)

========

Karwa Chauth : जाणून घ्या करवा चौथ व्रताचा संपूर्ण विधी

========

देवी लक्ष्मी हत्तीवर स्वार झाल्याची कथा पांडव, कुंतीदेवी आणि ऐरावत यांच्याशी संबंधित आहे. लक्ष्मीच्या शुभ वाहनात चांदी किंवा सोन्याचा हत्ती अतिशय पवित्र मानला जातो, परंतु पितळ, लाकूड, कांस्य, संगमरवरी आणि लाल दगड देखील शुभ मानले जातात. लक्ष्मीला हत्तीवर बसवून घरात ठेवल्याने इतर देवतांचा आशीर्वादही सहज प्राप्त होतो. लक्ष्मी हत्तीवर स्वार होणे हे आरोग्य, सौभाग्य आणि यशाचे शुभ प्रतीक आहे. घरात असे चित्र किंवा मूर्ती अडथळे दूर करतात आणि पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतात. मग यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर नक्कीच या गजलक्ष्मीला घरी आणा आणि तिची विधिवत पूजा करा. यामुळे नक्कीच तुमची आर्थिक वृद्धी होईल आणि यश मिळेल. (Social News)

(टीपः हा लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. आम्ही कोणत्याही तथ्यांची पुष्टी करत नाही.) Latest Marathi News

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/goddess-lakshmi-with-auspicious-elephant/







Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी