Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?
दसरा, विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच विजय. दृष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणजे विजयादशमी. या दिवसाला अनेक अर्थाने महत्व आहे. आदिशक्तीच्या महिषासुराचा वध याच दिवशी केला. रामाने देखील युद्धात विजयादशमीलाच रावणाचा वध केला. याच मुले दसऱ्याचे दुसरे नाव विजयादशमी असे असावे. विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. या दिवसाचे रामायणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेताना रामाची हनुमान आणि वानरसेनेशी भेट झाली. सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाशी युद्ध करून पुन्हा सीतेला मिळवण्यासाठी याच वानरसेनेने मदत केली. मुख्य म्हणजे एकीकडे रावणासारख्य बलाढ्य राक्षसाची असुरी सेना, तर दुसरीकडे युद्धाचे कोणतेही प्रशिक्षण नसलेली आणि पहिल्यांदाच एवढे मोठे युद्ध करणारी रामाची वानरसेना. रामाची ही वानरसेना जवळपास एक लाखाच्या आसपास होती. (Navratri) Top stories
रामाला युद्धात प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी वानर सेना तत्पर होती. अगदी सीतेचा शोध घेण्यापासून ते तिला संदेश देण्यापर्यंत, रावणाशी चर्चा करण्यासाठी देखील याच वानर सेनेने मोठी भूमिका बजावली. मात्र जेव्हा राम आणि रावणाचे अंतिम युद्ध झाले आणि या युद्धामध्ये रामाने रावणाचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला. त्यानंतर सीता माता परत आली. पण वानर सेना कुठे गेली याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. रावणावर विजय मिळवल्यानंतर रामाने बिभीषणाकडे लंका सोपवले आणि ते पुन्हा अयोध्येला परतले. या सर्व घटनांमध्ये हनुमान त्यांच्यासोबत होते, मात्र वानरसेना नव्हती. मग या युद्धानंतर ही वानरसेना कुठे गेली?, तिचे काय झाले? जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती. (Todays Marathi News)
वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडात असलेल्या माहितीनुसार, सुग्रीव लंकेहून परतल्यावर प्रभू श्रीरामाने त्यांना किष्किंधा नगरीचा राजा बनवले. बालीचा मुलगा अंगद युवराज झाला. या दोघांनी मिळून तेथे अनेक वर्ष राज्य केले. श्रीराम-रावण युद्धात मोठं योगदान देणारी ही वानरसेना पुढे अनेकवर्ष सुग्रीवासोबत राहिली. यानंतर त्यांनी कोणतेच मोठे असे युद्ध केले असावे. वानर सैन्यातील सदस्य नल आणि नीला हे सुग्रीवाच्या राज्यात मंत्री म्हणून काम करत होते. सुग्रीव आणि अंगद यांनी किष्किंधाचे राज्य वाढवले. हे शहर आजही अस्तित्वात आहे. (Top Marathi News)
किष्किंदा कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे जगप्रसिद्ध हंपीजवळ बेल्लारी जिल्ह्यात आहे. राम आणि लक्ष्मण ज्या गुहांमध्ये राहिले होते त्या किष्किंधा येथेही आहेत. त्या गुहांमध्ये खूप जागा आहे. किष्किंधाभोवती खूप दाट जंगल असून त्याला दंडकारण्य म्हणतात. तिथे राहणाऱ्या आदिवासींना बंदर म्हटलं जात असं. रामायणात वर्णन केलेला किष्किंधाजवळील ऋष्यमूक पर्वत आजही अस्तित्वात आहे. तिथे हनुमानाचे गुरु मातंग ऋषी यांचा आश्रम होता. (Latest Marathi News)
रावणाने सीतेला कैद केल्यानंतर, श्री रामांनी हनुमान आणि सुग्रीवाच्या मदतीने वानर सैन्य गोळा केले आणि लंकेला निघाले. तामिळनाडूचा हा किनारा एक हजार किलोमीटर लांब आहे. कोडिकराई बीच वेलंकन्नीच्या दक्षिणेस आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क सामुद्रधुनीने वेढलेले आहे. राम तिथेच थांबला, सल्लामसलत केली आणि मग रामेश्वरकडे निघाला. (Top Trending News)
=========
Navratri : नवरात्र! महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांची माहिती
=========
वानर सैन्यात वानरांचे अनेक गट होते. त्यात सुमारे एक लाख माकडे होती. ती माकडे लहान राज्यांची छोटी सैन्ये होती. ते किष्किंदा, कोल, भिल्ल, अस्वल आणि वनवासी होते. श्री रामांनी कुशलतेने त्यांना एकत्र आणले. लंका जिंकल्यानंतर, वानरांची ती प्रचंड सेना आपापल्या राज्यात परतली. रामाने लंका आणि किष्किंधा शहर अयोध्या राज्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नाकारला. वानर सेना श्री रामाच्या राज्याभिषेकासाठी अयोध्येला गेली; पण तुकानंतर ही सेना आपापल्या ठिकाणी परतली. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/ramayan-story-where-does-rams-monkey-or-vaner-sena-gone-after-won-shrilanka-battle/
Comments
Post a Comment