Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !
मानवजातीवर येऊ घातलेल्या दोन मोठ्या धोक्यांनी शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत. त्यातील एक धोका हा आइसलॅंड येथील बारदारबुंगा ज्वालामुखीपासून आहे. तर दुसरा धोका अंतराळातील कच-यापासून आहे. या दोन्हीही धोक्यांचा प्रकोप केव्हा होईल, हे सांगता येणार नाही. तसेच त्यांच्यापासून माणसाचा बचाव कसा करायचा याचाही उपाय अद्याप हाती लागला नसल्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत. आइसलँडमधील सर्वात मोठ्या ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक असलेल्या बारदारबुंगा ज्वालामुखीत 14 जानेवारी पासून मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत 130 हून भूकंप येथे झाले आहेत. तज्ञांच्या मते ज्वालामुखीचा स्फोट येण्यापूर्वीची ही परिस्थिती आहे. हा स्फोट एवढा मोठा असेल की त्यामुळे हिमनदी फुटू शकते. असे झाले तर जमिनीतून कधीही आगीचा पूर येऊ शकतो. (Space Waste And Volcano) यामुळे मोठा विनाश होण्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. आइसलँडमधील बारदारबुंगा ज्वालामुखीभोवती भूकंपाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यात 5.1 रीक्टर स्केलचा भूकंप ही असल्यामुळे शास्त्रज्ञ...