China : चिनी वर…पाकिस्तानी वधू !
वेगानं वाढणा-या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनमध्ये १९८० मध्ये एक मूल धोरण लागू करण्यात आले. हे धोरण २०१५ पर्यंत लागू राहिले आणि नंतर हळूहळू ते रद्द करण्यात आले. या ३५ वर्षाच्या काळात चीनमधील लोकसंख्या नियंत्रणात राहिली. मात्र या एक मूल धोरणाचा परिणाम चीनमध्ये २०१५ नंतर जाणवू लागला. त्यामुळे २०१६ साली चीनमध्ये दांम्पत्यांना दोन मुले करण्याचा आग्रह सुरु झाला. २०२१ पासून तर कमीत कमी तीन मुले हे धोरण चीनमध्ये आखण्यात आले. फारकाय चीनमध्ये मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारीही सरकार घेत आहे. असे असले तरी येथील लोकसंख्येमध्ये होत असलेली घसरण थांबवता येत नाही. कारण एक मूल धोरणाचा विपरीत परिणाम चीनमध्ये झाला आहे. लोकसंख्येमध्ये कमालीचे असंतुलन झाल्यामुळे स्त्री-पुरुष यांची लोकसंख्या विषम झाली आहे. परिणामी आता चीनमध्ये तरुणांना लग्न करण्यासाठी मुलगीही मिळत नाही. (China) International News अशा तरुणांना आता लग्न करण्यासाठी पाकिस्तानी किंवा बांगलादेशी मुली मिळवून देण्याचे एक मोठे रॅकेटच चीनमध्ये चालवण्यात येत आहे. चिनी वर आणि पाकिस्तानी वधू असे विवाह चीनमध्ये आता सर्वमान्य झाले आहेत. ...