Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित
ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील सुरूच आहे. असरानी, सतीश शाह, पंकज धीर आदी अनेक मोठ्या कलावंतांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमधील अतिशय जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे देखील निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुलक्षणा यांनी केवळ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानेच नाही तर आपल्या सुमधुर आवाजाने देखील प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री आणि गायिका अशी त्यांची ओळख होती. सोशल मीडियावर कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Sulakshana Pandit) Latest Marathi News प्रकृती अस्वास्थामुळे सुलक्षणा यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलक्षणा पंडित या अभिनेत्री विजेता पंडित आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय संगीतकार जोडी जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. दरम्यान सुलक्षणा यांचे भाऊ असलेल्या ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ललित ...