Donald Trump : ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडियावर केलेल्या एका पोस्टमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना अटक केल्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्थात हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार झाला असला तरी ट्रम्प खरोखरच ओबामा यांना अटक करण्याची तयारी करत असल्याचे अमेरिकेतील राजकीय तज्ञांचे मत आहे. कारण या व्हिडिओमध्ये ट्रम्प हे ओबामांना अटक करताना हसताना दाखवण्यात आले आहेत, शिवाय कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असा मेसेजही या पोस्टवर ट्रम्प यांनी लिहिला असल्यामुळे ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. (Donald Trump) International News ट्रम्प आणि ओबामा यांच्या या दुष्मनीमागे असलेले खरे कारणही चर्चेत आले आहे. या सर्वामागे ट्रम्प यांचा मागचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख आणि ट्रम्प प्रशासनात सामील झालेल्या माजी काँग्रेस सदस्य तुलसी गॅबार्ड यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ओबामा प्रशासनावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ओबामा यांनी रशियाला ट्रम्प यांच्या सं...