Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय
उन्हाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागतात. अति ऊन आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगले नाही. आपणही जर कडक उन्हात गेलो तर आपल्याला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील त्रास विविध उपाय करून आपल्याला कमी करता येतात. मात्र याच उन्हाळ्यात सगळ्यांना सर्वात जास्त भेडसावणारी आणि डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे ‘घाम’.(Sweating) Marathi News उन्हाळ्यात घाम येणे खूपच सामान्य बाब आहे. सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात घाम येत असतो. मात्र हा घाम खूप त्रासदायक देखील असतो. अति घाम येण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते, लवकर थकवा जाणवतो, चिडचिड होते. घाम न येण्यासाठी आपण २४ तास एसीमध्ये नाही बसू शकत. मग घाम कमी यावा किंवा येऊच नये यासाठी काही उपाय असतात का? जरी घाम आला तरी त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये. त्याआधी जाणून घेऊया घाम का येतो? आणि घाम येण्याची कारणं. (Summer News) घाम का येतो? आपल्या त्वचेवर असणाऱ्या घामाच्या ग्रंथी घाम तयार करतात. घामाच्या ग्रंथी ह्या संपूर्ण शरीरावर असतात. मात्र त्यातही प्रामुख्याने त्या कपाळावर, काखेत, हातापायांचे तळव्यांवर जास्त असतात....