America : अमेरिकेतील शिक्षण विभागालाच टाळे !


ब-याचवेळा सरकारी अनुदानातून चालणा-या शाळांमध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी अचानक भेट देतात. वर्गात जाऊन त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे, याची पाहणी करतात, आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल, याबाबत मार्गदर्शन करतात. फक्त आपल्याकडे नाही तर अशीच पाहणी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही होते. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशातील शाळांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा जाणून घेतला. यानंतर जो निकाल लागला, त्यामुळे ट्रम्प यांनी चक्क अमेरिकेच्या शिक्षण विभागाला टाळं लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून त्यामुळे 4400 नागरिक बेकार झाले आहेत. ट्रम्प यांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. (America)

ट्रम्प यांनी आपला हा निर्णय जाहीर करतांना एक व्हिडिओही जाहीर केला आहे. त्यात सातवीच्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारतांना ते दिसत असून या विद्यार्थ्यांना नीट वाचताही येत नसल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे, अमेरिकेतील शिक्षण सुधारणांशी संबंधित त्यांच्या योजनेचा एक भाग आहे. ट्रम्प यांनी हा शिक्षण विभाग बंद करतांना अमेरिकेतील 70 टक्के विद्यार्थी नीट वाचू शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्यासाठी शिक्षण विभाग जबाबदार आहे. शिवाय अमेरिकन शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कट्टरपंथी आणि अमेरिकाविरोधी करण्यात येत असल्याचा आरोपही केला आहे. तसेच शाळांमध्ये लिंगभेदाचा प्रचार करण्यात येत असून यामुळेच अमेरिकेत लिंगबदल चळवळ सुरु झाल्याचेही सांगितले आहे. एवढं सांगूनच ट्रम्प गप्प बसले नाहीत तर त्यांनी या शिक्षण विभागातील काही व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, त्यामुळे अमेरिकेच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (International News)

प्रगत अमेरिकेचे चित्र नेहमी दाखवले जाते. मात्र या चित्राच्या आड काय लपले आहे, याचा खुलासा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका व्हिडिओमधून सादर केला आहे. त्यात ट्रम्प यांनी एका विद्यार्थिनीला पुस्तक वाचायला दिले, मात्र ही विद्यार्थी नीट वाचूही शकली नाही. तसेच गणिताच्या बाबतही झाले. अत्यंत सोप्पी अशी गणिते सातवी-आठवीची मुलं सोडवू शकत नसल्याचे ट्रम्प यांनी प्रत्यक्ष दाखवून अमेरिकेच्या शाळांमध्ये कशा पद्धतीनं शिकवले जात आहे, हे जगासमोर ठेवले आहे. अमेरिकेचा शिक्षण विभाग बंद करतांना ट्रम्प यांनी अमेरिका इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतो. (America)

परंतु अमेरिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन शिक्षण विभागाची स्थापना 1979 मध्ये अमेरिकन काँग्रेसने कॅबिनेट-स्तरीय एजन्सी म्हणून केली. या विभागाला 268 अब्ज डॉलर्स एवढी निधी देण्यात येतो. यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप आता ट्रम्प प्रशासन करत आहे. यासंदर्भात व्हाईट हाऊसनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 40 वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शिक्षण विभाग, शिक्षण क्षेत्रात सुविधा देण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या शाळांमधील इयत्ता चौथीमधील 40 टक्के विद्यार्थी वाचूही शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवतांनाही शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यानुसारच आता त्यांनी शिक्षण विभागावर कारवाई करत, तो बंद कऱण्याचा आदेश दिला आहे. शिक्षण विभागच बंद झाल्यावर अमेरिकेमधील शाळांचा कारभार आता कसा चालणार, हा प्रश्न आहे. शिक्षण विभाग बंद झाला तर शाळांमध्ये असमानता निर्माण होण्याचा धोका आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात शिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका असते, मात्र हा विभागच बंद केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अनागोंदी तयार होईल, असे अमेरिकेच्या शिक्षण तज्ञांचे मत आहे. मात्र राष्ट्रीय मूल्यांकन चाचणीच्या अहवालामध्ये अमेरिकन विद्यार्थी शालेय शिक्षणात मागे पडत असल्याचे स्पष्ट झाल्यावरच हा निर्णय घेण्यात आल्याचे व्हाईट हाऊसतर्फे स्पष्ट कऱण्यात आले आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय घेतांना अमेरिकन शिक्षण विभागावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. अमेरिकेच्या शाळांमध्ये अमेरिकन मुलांवर कट्टरपंथी विचार लादण्यात येत आहेत. तसेच अमेरिकाविरोधी विचारसरणी या मुलांना शिकवण्यात येत आहे. याशिवाय अमेरिकेत वाढलेली ट्रान्सजेंडर चळवळ या शाळांमधूनच उदयाला आल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. या सर्वाची चौकशी करण्याचा आदेशही ट्रम्प यांनी देत, शिक्षण विभागातील गेल्या 40 वर्षातील अनागोंदी पुढे आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (America)

Original content is posted on: https://gajawaja.in/america-and-education-marathi-info/


 

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी